डेंगीच्या रुग्णांची घटली संख्या

By Admin | Updated: November 28, 2014 00:43 IST2014-11-28T00:43:35+5:302014-11-28T00:43:35+5:30

आठवडाभरापासून शहरात वाढू लागलेली थंडी महापालिकेच्या मदतीला धावली आहे.

The number of Dengue patients decreased | डेंगीच्या रुग्णांची घटली संख्या

डेंगीच्या रुग्णांची घटली संख्या

पुणो : आठवडाभरापासून शहरात वाढू लागलेली थंडी महापालिकेच्या मदतीला धावली आहे. त्यामुळे महापालिकेकडून डेंगीविरोधात मोठय़ा प्रमाणात राबविण्यात येत असलेली जनजागृती मोहीम आणि वाढत्या थंडीने डेंगीचे रुग्ण घटण्यास सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात या आजाराची लागण झालेले अवघे 5 रुग्ण आढळून आले. मागील महिन्यात हा आकडा सरासरी 5क्च्या घरात, तर दोन आठवडय़ांपूर्वी सरासरी 2क् ते 3क् होता. 
गेल्या 4 महिन्यांत शहरात या आजाराची लागण झालेले तब्बल 3 हजार रुग्ण आढळून आले, तर सहा जणांना आपला प्राण गमवावा लागला होता.
ही साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने गेल्या महिनाभरात शहरातील घरन् घर पिंजून काढले होते. तसेच, गेला संपूर्ण आठवडा जनजागृती सप्ताह म्हणून राबविण्यात आला होता. परिणामी, शहरात डेंगीचे रुग्ण घटत असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी दिली. (प्रतिनिधी)
 
तारीख                 रुग्ण 
21 नोव्हेंबर            15
22 नोव्हेंबर            13
23 नोव्हेंबर            1क्
24 नोव्हेंबर            11
25 नोव्हेंबर            12
26 नोव्हेंबर          1क्
27 नोव्हेंबर         5
 
महिना                रुग्णसंख्या
जुलै                       63क्
ऑगस्ट                   591
सप्टेंबर                   918
ऑक्टोबर                56क्
नोव्हेंबर 27              328

 

Web Title: The number of Dengue patients decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.