कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजाराच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:11 IST2021-04-13T04:11:31+5:302021-04-13T04:11:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात सोमवारी कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा ५ हजाराच्या आत आल्याचे समाधानकारक चित्र पाहण्यास ...

The number of corona victims is within five thousand | कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजाराच्या आत

कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजाराच्या आत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात सोमवारी कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा ५ हजाराच्या आत आल्याचे समाधानकारक चित्र पाहण्यास मिळाले असून, आज दिवसभरात झालेल्या २२ हजार ४६६ तपासण्यांपैकी २१़ ५७ टक्के कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ आज ४ हजार ८४९ जण नव्याने कोरोनाबाधित आढळून आले आहेत़

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात आज दिवसभरात ६३ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी ५३ जण हे पुण्यातील आहेत तर १२ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ एकूण कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची टक्केवारी ही सद्यस्थितीला १़ ७३ टक्के इतकी आहे़

शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार ६२ कोरोनाबाधित रूग्ण हे आॅक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ५० रूग्ण हे गंभीर आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ८९६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़

शहरात आत्तापर्यंत १७ लाख ४४ हजार १८० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ३४ हजार ५१० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी २ लाख ७५ हजार ३३३ कोरोनामुक्त झाले आहेत़

-----------------------------------

Web Title: The number of corona victims is within five thousand