खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सख्ख्या भावांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:08 IST2021-06-27T04:08:11+5:302021-06-27T04:08:11+5:30

पुणे : खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या सख्ख्या भावांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ च्या गुन्हे शाखेने ...

Number of brothers arrested for attempted murder | खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सख्ख्या भावांना अटक

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सख्ख्या भावांना अटक

पुणे : खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या सख्ख्या भावांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ च्या गुन्हे शाखेने अटक केली. जुल्फीकार नजीर शेख (वय ३२, रा. १६१ रविवार पेठ) आणि मुस्तफा नजीर शेख (वय २७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना फरासखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील कर्मचारी तडीपार, मोक्का आणि फरारी आरोपींचा शोध घेत असताना त्यांना विविध गंभीर गुन्ह्यातील आरोपी या भागात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून शिताफीने दोघा भावांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहायक पोलीस फौजदार शाहीद शेख, पोलीस नाईक अतुल मेंगे, धनंजय ताजणे, गणेश पाटोळे, प्रमोद मोहिते, मॅगी जाधव व पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांनी केली.

--------------------------------------

Web Title: Number of brothers arrested for attempted murder