व्यावसायिकाचे अपहरण करुन काढला नग्न व्हिडिओ ; पैसे न दिल्यास व्हायरल करण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:11+5:302020-11-28T04:09:11+5:30

पुणे : कर्जाची रक्कम फेडल्यानंतर देखील आणखी पैशाची मागणी करीत एका व्यावसायिकाचे अपहरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. त्या ...

Nude video of professional kidnapped; Threatening to go viral if not paid | व्यावसायिकाचे अपहरण करुन काढला नग्न व्हिडिओ ; पैसे न दिल्यास व्हायरल करण्याची धमकी

व्यावसायिकाचे अपहरण करुन काढला नग्न व्हिडिओ ; पैसे न दिल्यास व्हायरल करण्याची धमकी

पुणे : कर्जाची रक्कम फेडल्यानंतर देखील आणखी पैशाची मागणी करीत एका व्यावसायिकाचे अपहरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. त्या व्यावसायिकाला नग्न करून पट्ट्याने जबर मारहाण करण्यात आली. पैसे न दिल्यास तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तातडीने पावले उचलत तिघांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

अविनाश कांबळे(28,रा.टिंगणेनगर), तुषार शेळके, तानाजी जाधव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विकास शहाजीराव कांबळे(36,रा.उत्तरेश्‍वर नगर लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. यातील अविनाश कांबळे हा लेबर सप्लायर म्हणून काम करतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विकास कांबळे याचा रॉयल सोल्यूशन नावाने टेली मार्केटिंगचा व्यवसाय आहे. त्याने अविनाश कांबळेकडून पाच लाखाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज त्याने फेडले होते. यानंतरही अविनाश अव्वाच्या सव्वा व्याजाची रक्कम विकासकडे मागत होता. मात्र मध्यंतरी लॉक डाऊन झाल्याने विकासचा व्यवसाय बसला होता. यामुळे तो व्याजाची रक्कम देऊ शकला नाही. याचा राग मनात धरत बुधवारी अविनाश हा विकासच्या कार्यालयाखाली आला. त्याने विकासला खाली बोलावून घेतले. यानंतर त्याला दुचाकीवर बसवून कळसगावातील मोकळ्या मैदानात नेले. तेथे त्याला कपडे उतरवण्याला लावून तुषार व तानाजीच्या मदतीने कमरेच्या पट्टयाने मारहाण करण्यात आली. याचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण देखील करण्यात आले. पैसे न दिल्यास हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर करत आहेत.

.......

Web Title: Nude video of professional kidnapped; Threatening to go viral if not paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.