नाभिक समाजाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:11+5:302021-05-05T04:16:11+5:30
अद्यापही मदतीपासून वंचित सुपे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लादले आहेत. मात्र, नाभिक समाजाला शासनाकडून तरी ...

नाभिक समाजाची
अद्यापही मदतीपासून वंचित
सुपे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लादले आहेत. मात्र, नाभिक समाजाला शासनाकडून तरी अद्याप उपेक्षाच मिळाल्या आहेत. तर, याकामी दौंड तालुक्याप्रमाणे उद्योगपतींनी पुढे येऊन समाजाला आर्थिक मदत करण्याची अपेक्षा आहे.
बारामती तालुक्यातील संपूर्ण नाभिक समाज हा पिढीजात व्यवसायावर अवलंबून आहे. तर, शासनाच्या निर्बंधामुळे सलून दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. तसेच, उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन त्यांना उपलब्ध नाही. या समाजात रोज मिळणाºया उत्पन्नावर कुटुंबाची रोजीरोटी भागवली जात होती. मात्र तीच रोजीरोटी बंद झाल्याने समाज उघड्यावर आला आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक समस्यांना कंटाळून काहींनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. मात्र, या कुटुंबांना अद्याप शासनाकडून मदत मिळालेली नाही. दौंड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य व उद्योजक प्रशांत शितोळे यांनी नाभिक समाजातील सुमारे ३७ कुटुंबाला प्रत्येकी ५ हजाराची आर्थिक मदत दिली आहे. त्यांनी केलेली मदत निश्चित इतरांना प्रेरणादायी ठरावी. त्यामुळे बारामती तालुक्यातही अशाच उद्योजकांनी पुढे येऊन नाभिक समाजाला मदतीची अपेक्षा आहे. दौंड तालुक्यातील उद्योजकाप्रमाणे राज्यभर नाभिक समाजातील कुटुंबाला तारणाऱ्या उद्योजकांची खरी गरज या काळात निर्माण झाली आहे.