शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य खरेदीवर आता मटेरिअल मॅनेजमेंट चा वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 20:09 IST

महापालिकेच्या विविध विभागामार्फत साहित्य खरेदी करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येतात.

ठळक मुद्देमहापालिका : वर्षांला शंभर ते सव्वाशे कोटींची वस्तू खरेदीमहापालिका प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र मटेरिअल मॅनेजमेंट हे स्वतंत्र अ‍ॅप विकसितमहापालिकेच्या वतीने वाहन खरेदीपासून, संगणक, कार्यालयीन उपयोगाचे साहित्ये मोठ्या प्रमाणात खरेदी

पुणे: महापालिकेच्या विविध विभागाच्या वतीने वर्षांला तब्बल शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची विविध प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या जातात. परंतु कोणत्या विभागाने नक्की किती खरेदी केली, प्रत्येक्ष किती वस्तू आल्या हे तपासण्यासाठी कोणतही ठोस यंत्रणा महापालिकेकडे नाही. यामुळेच महापालिकेच्या वस्तू खरेदीवर वॉच ठेवण्यासाठी प्रशासनाने आता खास मटेरिअल मॅनेजमेंट स्वतंत्र अ‍ॅप  विकसित केले आहे. या अ‍ॅपमुळे कोणत्या विभागाला कशाची गरज आहे, किती वस्तू खरेदी केल्या, प्रत्यक्ष किती आल्या याची कार्यालयात बसून माहिती उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या विविध विभागामार्फत साहित्य खरेदी करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येतात. महापालिकेच्या वतीने आतापर्यंत कोणत्याही वस्तूची खरेदी करताना निविदा प्रक्रिया राबवून अथवा शासनाने निश्चित केलेल्या दर सुचीनुसार वस्तूची खरेदी केली जात होती. परंतु यामध्ये प्रशासनाकडून अनेक पळवाटा काढून चढ्या दराने वस्तू खरेदी करण्यात येत होत्या. वस्तू खरेदीतील गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र शासनाने सर्व शासकीय कार्यालयांसाठी आॅनलाईन खरेदी (जीईएम) पोर्टलचा पर्याय समोर आणला. या जीईएम पोर्टलवर सध्या वाहनापासून ते थेट पेन, पेन्सिलपर्यंत सर्व वस्तू उपलब्ध आहेत. आॅनलाईन खरेदीने  महापालिकेचे पैसे काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. परंतु नक्की कोणत्या विभागाला किती वस्तूची गरज आहे, किती खरेदी केल्या व प्रत्यक्ष किती वस्तू त्या विभागाला मिळाल्या याबाबत वरिष्ठ अधिका-यांना माहिती मिळणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र मटेरिअल मॅनेजमेंट हे स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. --------------------वस्तू खरेदीचा घोळ कमी होणारमहापालिकेच्या वतीने वाहन खरेदीपासून, संगणक, कार्यालयीन उपयोगाचे साहित्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. केवळ साहित्य खरेदीवर महापालिकेचे वर्षाला तब्बल शंभर ते सव्वा कोटी रुपये खर्च होतात. परंतु यामध्ये सध्या कोणताही ताळमेळ नाही. प्रत्येक विभाग स्वतंत्र खरेदी करतो, त्यामुळे एकत्रीत अशी माहिती मिळत नाही, एखाद्या विभागाने संगणक खरेदी केले तर त्याची गरज होती का, किती संगणकची गरज आहे, जुन्या संगणकाचे काय झाले, किती संगणक खरेदी केले, प्रत्यक्ष किती आले याची सर्व माहिती एकत्रीतपणे या अ‍ॅपमुळे मिळणार आहे. यामुळे महापालिकेतील वस्तू खरेदीतील घोळ कमी होईल.-तुषार दौंडकर, उपायुक्त 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाonlineऑनलाइन