शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आता जिभेचे लाड थांबवा; हॉटेलचे मेन्यू कार्ड गॅसवर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 13:31 IST

अभिजित कोळपे पुणे : दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. पेट्रोल बरोबर गॅसचे दरही सातत्याने वाढत आहे. आता व्यावसायिक गॅस पुन्हा ...

अभिजित कोळपे

पुणे : दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. पेट्रोल बरोबर गॅसचे दरही सातत्याने वाढत आहे. आता व्यावसायिक गॅस पुन्हा १०० रुपयांनी महागला आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस दोन हजारांच्या पुढे गेला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून मागील तीन महिन्यांत ३५० रूपयांनी दरात वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. घरगुती गॅस बरोबरच आता व्यावसायिक गॅसचे दरही सातत्याने वाढत असल्याने नाईलाजाने हॉटेलमधील प्रत्येक पदार्थांचे दर वाढवावे लागत आहे, असे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

पुणे शहरात घरगुती गॅसचे दर आता ९०० रूपयांच्या पुढे गेले आहेत. तर व्यावसायिक गॅसचे दरही सातत्याने वाढत आहे. जूनमध्ये १४७३.५०, तर जुलै महिन्यात १५५० रुपये, सप्टेंबर १७१५.७८ रूपये, तर ऑक्टोबरमध्ये १७५०.५० रूपये दर होता. ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर या तीन महिन्यांत ३५० रूपयांनी दरवाढ झाली आहे. हॉटेलमधील जवळपास प्रत्येक पदार्थांचे दर किमान २ रूपयांपासून ते १० रूपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर (१९ किलो)

महिना-दर

फेब्रुवारी २०२१-१५२६.९८

मार्च २०२१-१६२६.२८

एप्रिल २०२१- १६५४.३८

जुलै २०२१- १६३७.७८

ऑगस्ट २०२१-१६३७.७८

सप्टेंबर २०२१-१७१५.७८

ऑक्टोबर २०२१-१७५०.५०

नोव्हेंबर २०२१-२०००

डिसेंबर २०२१-२१००

१३०० चा सिलिंडर दोन हजारांवर पोहचला

साधारणपणे मागील डिसेंबर २०२० दरम्यान व्यावसायिक सिलिंडरचा दर १३०० रूपये दर होता. एका वर्षात जवळपास तब्बल ७०० ते ८०० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे १३०० रूपयांवरून थेट दोन हजारांच्या पुढे व्यावसायिक गॅस गेला आहे.

कोरोना अन् महागाई

घरगुती सिलिंडरची सबसिडी नावालाच

केंद्र शासनाकडून पूर्वी गॅसवर सबसिडी मिळत होती. साधारण १००, १२५ ते १५० रुपयांपर्यंत ही सबसिडी प्रत्येक गॅसच्या टाकीमागे मिळायची. केंद्र सरकारने मागील दोन वर्षांपासून मात्र ती पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे घरगुती सिलिंडरची सबसिडी नावालाच राहिली असून आता घरगुती गॅसवर कोणत्याही प्रकारची सबसिडी मिळत नाही.

घरगुती सिलिंडरचे दर (१४.२ किलो)

महिना  सिलिंडरचे दर

डिसेंबर २०२०  ६४७

जानेवारी २०२१  ६९७

फेब्रुवारी २०२१  ७९७

मार्च २०२१  ८२२

एप्रिल २०२१  ८१२

मे २०२१  ८१२

जून २०२१  ८१२

जुलै २०२१  ८३७.५०

ऑगस्ट २०२१  ८६२.५०

सप्टेंबर २०२१  ८८७.५०

ऑक्टोबर २०२१  ९०२.५०

नोव्हेंबर २०२१  ९०२.५०

डिसेंबर २०२१  ९०२.५०

मागील तीन महिन्यात सातत्याने व्यावसायिक गॅसचे दर वाढले आहेत. त्यामुळे महिन्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे नाईलाजाने पदार्थांच्या दरात वाढ करावी लागत आहे.

- मंगेश कदम, हॉटेल व्यावसायिक

कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे मागील वर्षभरात हॉटेल इंडस्ट्री पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे हॉटेल व्यावसाय प्रचंड आडचणीत आला आहे. आत कुठे हॉटेल व्यावसाय सुरळीतपणे सुरू झाला आहे. मात्र, गॅसची सातत्याने दरवाढ होत आहे. तसेच ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा लॉकडाऊन जर प्रशासनाने लावला तर हॉटेल इंडस्ट्रीचे प्रचंड नुकसान होणार आहे.

- श्रीधर गलांडे, हॉटेल व्यावसायिक

टॅग्स :Puneपुणेhotelहॉटेलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र