शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

पुणे पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार; अमिताभ गुप्ता यांची मुंबईत बदली, पिंपरी आयुक्तपदी विनयकुमार चौबे

By विवेक भुसे | Updated: December 13, 2022 23:18 IST

आपण पुणे पोलीस आयुक्तपदाचा सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याचे रितेशकुमार यांनी सांगितले.

पुणे- गृह विभागाने अपर पोलीस महासंचालक, सह आयुक्तांच्या बदल्या केल्या असून सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक रितेशकुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मुंबईत कायदा व सुव्यवस्थाच्या अपर पोलीस महासंचालक पदी बदली करण्यात आली आहे. आपण पुणे पोलीस आयुक्तपदाचा सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याचे रितेशकुमार यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनयकुमार चौबे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पुण्यातील अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांची सीआयडीमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

मुंबई म्हाडा येथील मुख्य दक्षता अधिकारी व अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मोटार परिवहन विभागाचे विशेष पोलीस महासंचालक सुनिल फुलारी यांची नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली केली आहे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक प्रवीण पवार यांची कोकण परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

मोक्का किंग अमिताभ गुप्ता -कोरोनामुळे कारागृहातून असंख्य गुन्हेगारांना जामीनावर सुटल्यानंतर शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली होती. सप्टेबर २०२० मध्ये अमिताभ गुप्ता यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना सर्वप्रथम या गुन्हेगारीवर अटकाव आणण्याचे आव्हान होते. त्यासाठी त्यांनी गुन्हेगारी टोळीवर अंकुश बसविण्यासाठी गेल्या अडीच वर्षात तब्बल ११४ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई केली तर या वर्षात ५१ टोळ्यांवर कारवाई केली. त्याचबरोबर बड्या ६८ गुन्हेगारांना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई केली. एका पथकाने अगोदर संपूर्ण माहिती काढायची, दुसर्या पथकाने धडक कारवाई करायची अन तिसर्या पथकाने सर्व पाळेमुळे खणून काढायची अशा पद्धतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहर परिसरात अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली. इतकेच नाही तर अगदी दादरा नगर हवेली, कर्नाटकातही पथके पाठवून कारवाई केली. 

टॅग्स :PuneपुणेTransferबदलीPoliceपोलिस