आता खरी कसरत मालमत्ता ताब्यात घेण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:10 IST2020-12-26T04:10:41+5:302020-12-26T04:10:41+5:30

पुणे : कररूपी पैशातून आम्ही शाळा, पाण्याच्या टाक्या, आरोग्य केंद्रांची उभारणी केली असल्याने, प्रथम त्याचे पैसे अदा करा व ...

Now the real exercise is to take possession of the property | आता खरी कसरत मालमत्ता ताब्यात घेण्याची

आता खरी कसरत मालमत्ता ताब्यात घेण्याची

पुणे : कररूपी पैशातून आम्ही शाळा, पाण्याच्या टाक्या, आरोग्य केंद्रांची उभारणी केली असल्याने, प्रथम त्याचे पैसे अदा करा व नंतर ताबा घ्या़ अशी गळ घालणाºया जिल्हा परिषदेकडून या २३ गावांमधील वास्तूंचा व मिळकतींचा ताबा घेणे हे महापालिकेसमोर मोठे आव्हान राहणार आहे़

पुणे महापालिका हद्दीत २०१७ मध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे व अन्य जिल्हा परिषदेच्या इमारतीच अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत़ या ११ गावांमध्ये अशा ३६७ वास्तू असून, यापैकी २५६ वास्तू आजपर्यंत महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत़ उर्वरित १०१ वास्तू (मालमत्ता) ताब्यात घेण्यासाठी सध्या कसरत चालू आहे़ या ११ गावांपैकी एका ठिकाणी ५० वर्षापूर्वी बांधलेल्या शाळेचा ताबा देण्यासाठी महापालिकेकडे ६५ लाख रूपये जिल्हा परिषदेने मागितले आहेत़ मुळात ही शाळा मोडकळीस आली असताना अशी अवास्तव मागणी होत आहे़

दरम्यान महापालिकेच्या ताब्यात न आलेल्या मालमत्ता व वास्तूंचे आता जिल्हा परिषद व महापालिका यांच्याव्दारे संयुक्त मुल्यांकन करून ती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे़ फेब्रुवारी,२०२० मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली होती़ मात्र कोरोना आपत्तीमुळे हे काम थांबले होते़ २३ गावांच्या समावेशाच्या पार्श्वभूमीवर हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली़

----------------------

Web Title: Now the real exercise is to take possession of the property