शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आता पाेलिसांना रिक्षा करता येणार स्कॅन ; सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून आरटीओचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 17:12 IST

सर्व परवानाधारक रिक्षांना क्यू- आर काेड लावण्याचा विचार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) सुरु आहे.

पुणे : खाेट्या नंबरप्लेट लावून रिक्षा चालविण्याचे प्रकार समाेर आल्याने तसेत शहरात अनधिकृत, अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्याने सर्व परवानाधारक रिक्षांना क्यू- आर काेड लावण्याचा विचार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) सुरु आहे. हा क्यू आर काेड लावल्यानंतर रिक्षाची सर्व माहिती पाेलिसांना उपलब्ध हाेणार आहे.  सध्या रिक्षांची संख्या शहरात वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रिक्षाला खाेटी नंबरप्लेट लावण्याचे प्रकार समाेर आले आहेत. त्यातच अवैध प्रवासी वाहतूकही शहरातील अनेक भागांमध्ये केली जाते. शहरात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना रिक्षा आणि इतर पर्यायांकडे वळावे लागते. काहीजण परवाना न घेता रिक्षा चालवत असल्याचे समाेर आले आहे. अशा रिक्षाचालकांकडून प्रवाशांशी वाद घालणे, मिटरप्रमाणे भाडे न आकारणे यासांरखे प्रकार घडत असून आरटीओच्या या निर्णयामुळे असे प्रकार कमी होऊन परवानाधारक चालकांना याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रिक्षा चालकाच्या सीटमागे हा क्यू- आर कोड लावण्यात येईल. परिणामी वाहतूक पोलिसांनाही तपासादरम्यान सहजपणे रिक्षाची माहिती उपलब्ध होणार आहे.  

वाहतूक पाेलिसांनी नुकताच काेंढवा परिसरात नाे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाला जॅमर लावून कारवाई केली. दाेन दिवस झाले तरी ती रिक्षा साेडवण्यासाठी काेणी आले नाही. वाहतूक पाेलिसांनी रिक्षावर असलेल्या नंबरच्या आधारे त्याच्या मालकाचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचा नंबर हा एका चारचाकीचा असल्याचे समाेर आले. त्यामुळे आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पाेलिसांनी दिली. 

क्यू - आर कोड संदर्भात आरटीओ प्रशासनाशी नूकतीच चर्चा करण्यात आली. आरटीओकडून शहरातील सर्व परवानाधारक रिक्षांना क्यू- आर कोड लावण्यात आल्यास वाहतूक पोलिसांनाही कोड स्कॅनकरुन माहिती मिळणे सोपे होणार आहे. - पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक

रिक्षांना क्यू - आर कोड लावण्यासंदर्भात प्राथमिक पातळीवर काम सुरू आहे. यासाठी ’आरटीए’च्या परवानगीची आवश्यकता आहे. पुढील काही दिवसात याबाबत निर्णय घेण्यात येईल. - संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाPuneपुणेRto officeआरटीओ ऑफीस