शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: "आता आम्हाला नाही तर कोणालाच नाही", सभेच्या जागेवरून राज ठाकरेंचा सज्जड इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 11:52 IST

पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे राज ठाकरेंची सभा सुरु

पुणे : पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे राज ठाकरेंची सभा सुरु आहे. संपुर्ण महाराष्ट्रतून असंख्य नागरिक सभेला उपस्थित राहिले आहेत. पुणेकरही रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तेही सभेसाठी आवर्जून आले आहेत. सभागृहात जागा पुरत नसल्याने नागरिकांना बाहेरही बसायची सोय मनसैनिकांनी केली आहे. जागेवरूनच सभेच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी सर्वांवर निशाणा साधला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना सभेसाठी जागा देण्यास नकार दिला जातो. तर इथून पुढे आम्हाला नाही तर कोणालाच नाही असा इशारा यावेळी राज यांनी दिला आहे.  राज ठाकरे म्हणाले, सभेसाठी सुरुवातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाची निवड करण्यात आली होती. त्यांनी सभेला जाग देण्यास नाकर दिल्याने कार्यकर्त्यांनी नदीपात्रातील जाग निश्चित केली. पण पावसाचे वातावरण असल्याने तीही रद्द करण्यात आली. अखेर गणेश कला क्रीडा मंचला सभा घेण्याचे ठरवण्यात आले. पण आता इथून पुढे सप महाविद्यालयच्या जागेत आम्हाला नाही तर कोणालाच सभा घेऊ देणार नाही असा सज्जड इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला आहे. 

राज ठाकरेंची सभा २१ ते २८ मे दरम्यान पुण्यात होणार होती. त्यासाठी शहरातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे राज ठाकरेंची सभा होणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली होती. त्यासाठी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांना परवानगीचे पत्र पाठवले होते. पुणे शहरातील सर परशुरामभाऊ महाविदयालय येथे सभेचे आयोजन करण्यात येणार होते. पण वाहतूक समस्या निर्माण होऊ नये. या दृष्टीने डेक्कन जिमखाना येथील मुठा नदी पात्रातील जागा निश्चित करण्यात आली असल्याचे पदाधिकाऱ्यांनी  सांगितले होते. 

डेक्कन जिमखाना येथील मुठा नदीपात्रातील सभा रद्द झाली  

 शासकीय यंत्रणेने केलेल्या सुचने नुसार मुठा नदी पात्रातील डेक्कन जिमखाना येथील नदीपात्रातील जागा निश्चित करण्यात आली होती. सदर ठिकाणी या अगोदरही मनसेच्या सभा झाल्या आहेत. या बाबतच्या संबंधित यंत्रणेच्या नाहरकत पत्र आपल्याला आम्ही देऊच तरी सदर ठिकाणी सभेसाठी स्टेज उभारणीस सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून बॅरिकेट बांधण्यास तसेच विदयुत व्यवस्थेसाठी मनोरे उभारण्यास परवानगी पदाधिकाऱ्यांनी मागितली होती. तसेच सभेच्या दिवशी शनिवार दि २१/५/२२ रोजी स्पीकरच्या वापरास परवानगी द्यावी हि विनंती त्यांनी केली होती. परंतु पावसाचे कारण देऊन सभा रद्द केली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारणStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय