आता गंगानगर येथे विद्युत दाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:12 IST2021-05-12T04:12:09+5:302021-05-12T04:12:09+5:30

यासाठी वेळोवेळी याठिकाणी भेट देऊन हे काम पूर्ण करण्यासाठी नगरसेवक गणेश ढोरे आग्रही होते. पुणे मनपाचे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ...

Now electric right at Ganganagar | आता गंगानगर येथे विद्युत दाहिनी

आता गंगानगर येथे विद्युत दाहिनी

यासाठी वेळोवेळी याठिकाणी भेट देऊन हे काम पूर्ण करण्यासाठी नगरसेवक गणेश ढोरे आग्रही होते. पुणे मनपाचे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने हे काम चालू होते. आता पुणे महानगरपालिकेच्या वतीने हे काम पूर्ण झाले असून याचा वापर सुरु झालेला आहे. या विद्युतदाहिनी बसवण्याचे कामाचा भूमिपूजन कार्यक्रम ते वेळोवेळी कामाची पाहणी व पाठपुरावा करण्याचे काम गणेश ढोरे यांनी केले.

यावर्षी फुरसुंगी स्मशानभूमीत सुद्धा अशाच प्रकारच्या आधुनिक व पर्यावरणपुरक विद्युतदाहिनी बसवण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून निधी प्राप्त करून घेतला. या फुरसुंगी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी बसवण्याचे काम हे येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येईल, असे गणेश ढोरे यांनी सांगितले.

Web Title: Now electric right at Ganganagar