शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकारी देऊ शकणार शाळांना सुट्ट्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 20:18 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

पुणे : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, जनजीवन विस्कळीत होणे, नद्यांना पुर येणे, अतिवृष्टी यांमुळे विद्यार्थी, शिक्षकांना शाळेपर्यंत पोहचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवितासह धोका निर्माण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष असतात. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुट्टी जाहीर केलेल्या दिवशी शाळेमध्ये परीक्षा असल्यास परीक्षांचे पुनर्नियोजन करून पुनर्परिक्षा घेण्याचे अधिकार संबंधित शाळेच्या मुख्यापकांना राहतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा सुरू असल्यास या परीक्षांचे पुर्ननियोजन करण्याचे अधिकार शिक्षण मंडळ व परिषदेकडे असतील, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :RainपाऊसSchoolशाळाcollectorजिल्हाधिकारी