आता देशाच्या कृषी अभ्यासक्रमात बदल

By Admin | Updated: December 13, 2014 23:04 IST2014-12-13T23:04:04+5:302014-12-13T23:04:04+5:30

सध्याचे कृषी शिक्षण उद्योग जगताला आणि कृषी क्षेत्रला जोडणारे नाही,तसेच शेतक-यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे नाही.

Now the changes in the agricultural curriculum of the country | आता देशाच्या कृषी अभ्यासक्रमात बदल

आता देशाच्या कृषी अभ्यासक्रमात बदल

पुणो : सध्याचे कृषी शिक्षण उद्योग जगताला आणि कृषी क्षेत्रला जोडणारे नाही,तसेच शेतक-यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे नाही.त्यामुळे  देशातील कृषी अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्यात असून पुढील शैक्षणिक वर्षापासून किंवा 2016-2017  या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे,अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्याचा विचार करता कृषी शिक्षण,संशोधन व विस्तार शिक्षण या त्रीसुत्रीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठ,डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ही चार विद्यापीठे काम करत आहेत. या विद्यापीठांशी 166 महाविद्यालये संलग्न आहेत. त्यामध्ये कृषी उद्यानविद्या, अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान आदी अभ्यासक्रमात 14 हजारांच्यावर विद्यार्थी शिकत आहेत.  (प्रतिनिधी)

 

Web Title: Now the changes in the agricultural curriculum of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.