आंबेगावात आता प्रचाराची रणनीती
By Admin | Updated: February 13, 2017 01:26 IST2017-02-13T01:26:20+5:302017-02-13T01:26:20+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक चुरशीने लढली जाणार असून आंबेगाव तालुक्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

आंबेगावात आता प्रचाराची रणनीती
मंचर : जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक चुरशीने लढली जाणार असून आंबेगाव तालुक्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून नेत्यांना आणण्याची रणनीती आखण्यात आली आहे. शिवसेना, भाजपाकडून राज्यातील विद्यमान मंत्र्यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँगे्रसकडून माजी मंत्र्यांना प्रचारासाठी आाणण्याची तयारी करण्यात आली आहे.
विशेषत: राष्ट्रवादी काँगे्रस व शिवसेना या दोन पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढत असेल. विजयी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सर्वच पक्ष करणार आहेत. प्रचारात त्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जाणार आहेत. प्रचारात नेत्यांच्या सभा आयोजित करून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न राहणार आहे. तालुक्यात माघारीपूर्वीच प्रचाराला जोमाने सुरुवात झाली आहे. शिवसेनेने पेठ येथे उपनेते नितीन बानगुडे यांची सभा घेतली आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात शिवसेनेकडून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रचारदौरे करणार असून प्रत्येक तालुक्यात त्यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
शिवसेना राज्यात सत्तेवर असल्याने सहकार राज्यमंत्री गुलाबराव पााटील, मंत्री विजय शिवतारे तसेच विश्वव्याख्याते शिवरत्न तोटे यांच्या प्रचाराच्या सभा घेणार आहे. भाजपाला तालुक्यात या निवडणुकीत ताकद दाखवायची आहे, म्हणून त्यांनी पेठ, मंचर, डिंभे भागात मंत्र्यांची सभा घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पाालकमंत्री गिरीश बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे, तसेच मंत्री विष्णू सावरा यांच्या सभेचे नियोजन करण्यात येत असल्याचे तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रचाराची धुरा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे असून ते स्वत: ठिकठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. मात्र शक्य झाल्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा घेण्याचा प्रयत्न असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी सांगितले.