पौष्टिक भाज्यांचे मोदक ठरले उत्कृष्ट
By Admin | Updated: September 7, 2014 00:30 IST2014-09-07T00:30:49+5:302014-09-07T00:30:49+5:30
कारले, बीट, पालक, कडधान्य आदी पालेभाज्यांपासून बनविलेले पौष्टिक मोदक.. मोदक हा नेहमी गोडच असतो; पण ही स्पर्धा जरा वेगळीच होती.

पौष्टिक भाज्यांचे मोदक ठरले उत्कृष्ट
पुणो : कारले, बीट, पालक, कडधान्य आदी पालेभाज्यांपासून बनविलेले पौष्टिक मोदक.. मोदक हा नेहमी गोडच असतो; पण ही स्पर्धा जरा वेगळीच होती. कारण, नारळाचे आणि साखरेपासून बनवलेले मोदक हे आपल्याला माहितीच आहेत; परंतु हे जरा हटके आणि पौष्टिक मोदक म्हणजे लोकमत सखींचे वैशिष्टय़च म्हणावे लागेल. आपले बाप्पा उपक्रमाअंतर्गत खास सखींसाठी मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेल्या पौष्टिक भाज्यांचा वापर करून एक नवीन स्वादाचा मोदक बनविण्याच्या स्पर्धेत सखी मंचच्या महिलांनी आपली पाककला दाखवली. लोकमत सखी मंचने आयोजित मोदक स्पर्धेमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणो सहभाग घेतला.
डोळ्यांबरोबर रसनेला तृप्त करणारे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक असे मोदक स्पर्धकांकडून तयार करण्यात आले होते. मधुमेहींसाठी ओट्स, कोंडा, बाजरी यांचा वापर करून स्पर्धकांनी बाप्पाला प्रिय असलेले पदार्थ तयार केले होते. तसेच, देशी मोदकाला विदेशी तडका देत चायनीज मोदकाने परीक्षकांचे मन मोहून घेतले. या स्पर्धेचे लोकमत सखी मंच नेहमीच सखींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्नशील राहिला आहे. नवीन पाककृती बनविणो व आपल्या कुटुंबाला खाऊ घालणो हा सर्वच सखींचा आवडता छंद असतो आणि तोच छंद जोपासण्यासाठी लोकमतने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये सखींना घरातूनच मोदक बनवून आणायचे होते. ते सजविण्यासाठी अध्र्या तासाचा वेळ देण्यात आला होता. महिलांनी गुलाबांच्या पाकळ्या, कँडल्स यांच्या साह्याने मोदकाची आरास केली
होती. स्पर्धा लोकमत कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली. छाया पांचाळ यांनी परीक्षण केले. (प्रतिनिधी)
वन डिश मिल
4आपल्यातील कौशल्य आजमावत सखींनी जेवणाच्या ताटाप्रमाणो ‘वन डिश मिल’ नावाच्या मोदकाच्या ताटात भात, भाजी, मोतीचूर लाड, सॅलेट यांचे सारमापासून बनविलेले मोदक हे खास आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
कुसुम झरेकर प्रथम
4या मोदक स्पर्धेत चांगली चुरस होती. यामध्ये कुसुम झरेकर यांचा पहिला, निकिता गुप्ता यांचा दुसरा, तर वर्षा कोनवडे यांचा तिसरा क्रमांक आला.
आम्हा सखींसाठी ‘लोकमत’ नेहमीच विविध उपक्रम राबवित असतो. महिलांमधील सुप्त कला या उपक्रमांमधून समोर येतात. त्यामुळे लोकमत हा महिलांसाठी एक व्यासपीठ बनला आहे. या अनोख्या मोदक स्पर्धेत सहभाग घेऊन मला खूप आनंद झाला.
- अन्नपूर्णा केळकर, स्पर्धक