शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पेपर ‘सेट’ करणाऱ्या प्राध्यापकांना विद्यापीठाकडून नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 01:44 IST

चौकशी सुरू : सोशल मीडियावर छायाचित्रे टाकून वाजवला होता डंका

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या काही प्राध्यापकांनी आम्ही पेपर सेट करायला गेलो होतो, अशी शेखी मिरविणारा ग्रुप फोटो सोशल मीडियावर टाकून गोपनीयतेचा भंग केल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले होते. विद्यापीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. संबंधित प्राध्यापकांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पेपर सेट करायला गेले असल्याच्या प्रकरणाबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित प्राध्यापकांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. एकाच महाविद्यालयातील चार प्राध्यापक अर्थशास्त्र विषयाचे प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी बोलाविण्यात आल्याच्या प्रकाराचीही गंभीर नोंद या बैठकीत घेण्यात आली आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बीए, बीकॉम, बीएस्सीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्या-त्या विषयांच्या अभ्यास मंडळांकडून प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांची निवड केली जाते. या प्राध्यापकांनी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम अत्यंत गोपनीय पद्धतीने करणे आवश्यक असते. प्रश्नपत्रिका तयार करणे हे काम अत्यंत संवेदनशील मानले जाते. विद्यार्थ्यांना तसेच इतर कुणाकडेही याबाबत त्यांनी वाच्यता करायची नसते. मात्र, ही गोपनीयता धुडकावून लावत प्रश्नपत्रिका तयार करणाºया अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी सोशल मीडियावर पेपर सेट करायला गेलो असल्याचे फोटो टाकले होते.याबाबतचे वृत्त रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर यावर विद्यापीठ वर्तुळातून टीकेचा भडिमार करण्यात आला होता. अनेक ज्येष्ठ प्राध्यापकांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.चौकशी करून अहवाल देऊ...कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिलेल्या निर्देशानुसार पेपर सेट करण्यासाठी गेल्याचे सोशल मीडियावरून शेअर केल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित प्राध्यापकांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्यानंतर याबाबतचा अहवाल विद्यापीठाकडे सादर केला जाईल.- डॉ. विजय खरे, अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी