तीन प्रभाग अधिका:यांना नोटीस
By Admin | Updated: November 27, 2014 00:00 IST2014-11-27T00:00:44+5:302014-11-27T00:00:44+5:30
पावसाळी पाण्याच्या निच:यासाठी बनविलेली रस्त्यावरील चेंबर उघडी असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे.

तीन प्रभाग अधिका:यांना नोटीस
पिंपरी : पावसाळी पाण्याच्या निच:यासाठी बनविलेली रस्त्यावरील चेंबर उघडी असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेचे
आयुक्त राजीव जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असा निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल कारवाई का करण्यात येऊ नये,
अशी कारणो दाखवा नोटीस तीन
प्रभाग अधिका:यांना बजावण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात पिंपळे गुरव येथे उघड्या चेंबरमध्ये एक दुचाकीस्वार चेंबरमध्ये पडून जखमी झाला. त्यानंतरही शहरात विविध ठिकाणी उघडी गटारे, चेंबर दिसून आली. अ, क आणि ड या तीन प्रभागांमध्ये अशी धोकादायक उघडी चेंबर रस्त्यांवर दिसून आली. ही धोकादायक परिस्थिती नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित प्रभाग अधिका-यांना कारणो दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थापत्य विभागाचे शहर अभियंता एम. टी. कांबळे यांनी तातडीने संबधित अधिका:यांना कारणो दाखवा नोटिसा बजाविल्या आहेत. संबधित अधिका:यांकडून उत्तर मिळाल्यानंतर दोषी आढळणा:या अधिका:यांवर कारवाई करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)