नोटा बदल : नागरिकांच्या रोषाने कर्मचारी हैराण

By Admin | Updated: November 17, 2016 01:59 IST2016-11-17T01:59:04+5:302016-11-17T01:59:04+5:30

आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक पोस्ट आॅफिसमध्ये अद्याप नवीन नोटा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

Note: Changes in the face of citizen's harassment | नोटा बदल : नागरिकांच्या रोषाने कर्मचारी हैराण

नोटा बदल : नागरिकांच्या रोषाने कर्मचारी हैराण

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक पोस्ट आॅफिसमध्ये अद्याप नवीन नोटा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. छोट्या गावांतील पोस्ट आॅफिसमध्ये नागरिक हेलपाटे मारीत आहेत. मंचर शहरातील पोस्ट आॅफिसमध्ये १० लाख रुपयांची मागणी असताना आज केवळ एक लाख रुपये उपलब्ध झाल्याने कर्मचाऱ्यांनाच रोषाला सामोरे जावे लागत आहे.
सरकारने १००० व ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणेच पोस्ट आॅफिसमध्ये नोटा बदलून मिळतील, अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. खेड्यापाड्यात असणाऱ्या पोस्ट कार्यालयात नवीन नोटा अद्याप उपलब्ध नाहीत. नागरिक मोठ्या संख्येने नोटा बदली करण्यासाठी येताहेत. मात्र, त्यांना केवळ हेलपाटे मारावे लागत आहेत. छोट्या गावात बँका नसल्याने त्यांना पोस्ट आॅफिस हा जवळचा पर्याय असतो. विशेषत: गृहिणी पोस्टात खाते काढून बचत करत असतात. ग्रामीण भागात अजूनही पोस्टामध्ये बचत, तसेच इतर व्यवहार करण्याचे प्रकार जास्त प्रमाणात होत आहेत.
मंचर येथील पोस्टात नावाला थोडेसे पैसे येतात. पैशाची मागणी दररोज वाढत असताना कॅश येत नाही. आज १० लाख रुपयांची मागणी होती. मात्र, प्रत्यक्षात १ लाख रुपयेच आले. त्याचे वाटप करताना कर्मचाऱ्यांंना चांगलीच कसरत करावी लागली.
पोस्ट रविवारी सुरू ठेवण्यात आले होते. पोस्टात तरी हक्काने पैसे मिळतील, असे नागरिकांना वाटले. मात्र, त्यांचा भ्रमनिरास होतो. आम्ही दररोज नव्या चलनाची मागणी करीत आहोत. उद्या जास्त रक्कम येण्याची शक्यता असल्याने शेलार यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Note: Changes in the face of citizen's harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.