शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या रकमेवर समाधान मानणार नाही ; पैसे घेण्यास डीएसकेच्या ठेवीदारांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 21:33 IST

डीएसके यांनी न्यायालयात जमा केलेले 6 कोटी 65 लाख रुपये ठेवीदारांना परत देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा, असे यापूर्वी न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार त्या रकमेचे सुमारे 32 हजार ठेवीदारांना समान प्रमाणात वाटप करण्याबाबत प्रस्ताव आहे.

पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची न्यायालयात जमा असलेल्या रकमेचे वाटप केल्यानंतर ठेवीदारांच्या वाट्याला येणारी रक्कम तुटपुंजी आहे. 6 कोटी 65 लाख रुपये सुमारे 32 हजार ठेवीदारांना समान प्रमाणात वाटले तर प्रत्येकाला केवळ 2 हजार रुपये मिळतील. लाखो रुपयांची फसवणूक झालेल्या ठेवीदारांना या रकमेचा काय फायदा होणार ? असा प्रश्न ठेवीदारांनी गुरुवारी न्यायालयात उपस्थित केला. त्यामुळे मिळणा-या त्या तुटपुंज्या रकमेवर समाधान मानणार नाही. व ती रक्कम स्वीकारणार नसल्याचा निर्धार ठेवीदारांनी केला आहे.  डीएसके यांनी न्यायालयात जमा केलेले 6 कोटी 65 लाख रुपये ठेवीदारांना परत देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा, असे यापूर्वी न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार त्या रकमेचे सुमारे 32 हजार ठेवीदारांना समान प्रमाणात वाटप करण्याबाबत प्रस्ताव आहे. मात्र तसेच संबंधित रक्कम घेण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 मे रोजी होणार आहे. या प्रकरणातील आरोपी डीएसके, हेमंती कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी आणि डीएसके डीएल कंपनी व इतर कंपन्यांचे नावे कोणताही बोजा नसलेल्या आणि तत्काळ विक्री योग्य अशा मालमत्तांची यादी तयार करण्यात येऊन ती न्यायालयात सादर करण्यात आली आहे. 

सदर मालमत्ता विक्रीमधून जमा होणारा पैसा हा न्यायालयाकडे जमा करून त्याचे ठेवीदारांना समप्रमाणात वितरण करण्यात यावे, असे सुचविण्यात आले आहे. डीएसके आणि कुटुंबीयांच्या बँक खात्यात असलेले सुमारे 12 कोटी रुपये पोलिसांनी गोठविले आहेत. ती रक्कम देखील यापुढील काळात ठेवीदारांना देण्याचा प्रस्ताव आहे, मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेले नाही. 

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणेCourtन्यायालय