शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पुण्यात एक-दोन नाही तर तीन-तीन बिबट्यांचा मुक्त वावर; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 13:44 IST

घटनेनंतर वनवभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे....

-किरण शिंदे

पुणे :पुणे जिल्ह्यात बिबट्याच दर्शन होणं काही नवीन नाही. पुणे जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्या सर्रास दिसतो. नागरिकांना त्याचा दर्शन होतच असतं. मात्र जुन्नर तालुक्यातून एक असा काहीसा व्हिडिओ समोर आलाय की तो पाहून अंगाचा थरकाप उडेल. नारायणगाव येथील एका शेतकऱ्याच्या घराजवळ एक दोन नाही तर तब्बल तीन तीन बिबटे फिरताना दिसले आणि बिबट्याचा हा मुक्त वावर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. जुन्नर तालुक्यातील मानवी वस्ती असलेल्या परिसरात बिबट्या आल्याच्या यापुर्वी अनेक घटना घडल्या. अनेकदा तर बिबट्याने नागरिकांवर हल्ले देखील केले आहेत. मात्र तीन तीन बिबटे एकत्र फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये मात्र दहशत पसरली आहे. या घटनेनंतर वनवभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

यावेळी तीन बिबटे एकत्र मुक्त वावर करताना दिसत आहेत. सुरुवातीला एक बिबट समोर येतोय आणि त्यानंतर त्याच्यामागून आणखी दोन बिबटे येताना दिसत आहेत. हे तीनही बिबटे एकत्र पुढे जाताना दिसतात. नारायणगाव येथील जुन्नर नारायणगाव रोडवरील साईबाबा मंदिराजवळ असलेल्या धनंजय दरंदळे यांच्या घराजवळचं हे दृश्य आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातून बिबट्या पळाला होता. मात्र त्याला वेळीच जेरबंद करण्यात आले आणि त्यानंतर पुणेकरांच्या जीवात जीव आला. परंतु त्या बिबट्याची दहशत संपलेली नसतानाच पुन्हा एकदा तीन-तीन बिबटे मुक्तपणे संचार करताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे तीनही बिबटे भक्षाच्या शोधात एकत्र फिरत असल्याचे सांगण्यात आले. मात्र तीन-तीन बिबटे अशा पकारे एकत्र फिरत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वनविभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्या