शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ संबोधावे - विजयकुमार जैन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 02:00 IST

महात्मा गांधी म्हणत, ज्या देशाला राष्ट्रभाषा नाही, तो देश मुका असतो. भारत विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक भाषा बोलल्या जातात.

पुणे : महात्मा गांधी म्हणत, ज्या देशाला राष्ट्रभाषा नाही, तो देश मुका असतो. भारत विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. देशाचा राष्ट्रीय प्राणी, पक्षी आणि मुद्राही आहे. मग आपल्या देशाला राष्ट्रभाषा का असू नये? त्यामुळे भारताची संवैैधानिक राष्ट्रभाषा जाहीर व्हावी, हिंदीला राष्ट्रभाषेचा, तसेच प्रांतीय भाषांना राज्यभाषेचा दर्जा द्यावा आणि भारताला इंडिया नव्हे, तर भारत म्हणूनच संबोधावे, अशी मागणी अभियानाचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार व संपादक विजयकुमार जैन यांनी केली.राष्ट्रभाषेच्या सन्मानासाठी ‘भारतीय भाषा अपनाओ अभियान’ अंतर्गत वरिष्ठ पत्रकार व संपादक विजयकुमार जैन यांच्या पुढाकारातून मुंबई येथून ही भाषा सन्मान यात्रा मंगळवारी सकाळी ६ वाजता निघाली. दि. ४ जानेवारीपर्यंत ही ‘भारतीय भाषा सन्मान यात्रा’ काढण्यात येणार आहे. भारतीय भाषा अपनाओ अभियानांतर्गत ५०० भारतीयांचे शिष्टमंडळ देशभर फिरून राष्ट्रभाषेसाठी जागृती करणार आहे. हे शिष्टमंडळ पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पुण्यातील नागरिक आणि पत्रकारांशी संवाद साधला.या वेळी राष्ट्रीय भाषा समितीचे एम. एल. गुप्ता, अभियानाचे मुख्य संयोजक व ‘जितो’चे माजी अध्यक्ष विजय भंडारी, महावीर प्रतिष्ठानचे विजयकांत कोठारी, अभियानाचे समन्वयक डॉ. कल्याण गंगवाल, रमेश ओसवाल, ‘जितो’चे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, पूना मर्चंट चेंबरचे पोपटलाल ओस्तवाल, अरुण सिंघवी व अभय सेठिया, जितो व महावीर प्रतिष्ठानचे विश्वस्तयांच्यासह इतर मान्यवर उपस्थितहोते.हिंदी दिवसाच्या पार्श्वभूमीवर ४ जानेवारी २०१९ रोजी हे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना निवेदन देणार आहे. भारतीय भाषांचा सन्मान वाढवावा, भारताची राष्ट्रभाषा असावी व भारताला इंडिया नव्हे, तर भारत संबोधावे, या मागण्यांचा समावेश आहे.- डॉ. कल्याण गंगवाल

टॅग्स :IndiaभारतPuneपुणे