वाघापूर-माळशिरस रस्त्यावर अपघात नव्हे, खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:18 IST2021-03-13T04:18:28+5:302021-03-13T04:18:28+5:30

वाघापूर-माळशिरस रस्त्यावर गुरुवारी (दि.११) मध्यरात्रीच्या सुमारास एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. तपासाअंती मृत व्यक्तीचे नाव हे ...

Not an accident on Wagahpur-Malshiras road, murder | वाघापूर-माळशिरस रस्त्यावर अपघात नव्हे, खून

वाघापूर-माळशिरस रस्त्यावर अपघात नव्हे, खून

वाघापूर-माळशिरस रस्त्यावर गुरुवारी (दि.११) मध्यरात्रीच्या सुमारास एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. तपासाअंती मृत व्यक्तीचे नाव हे गणेश वसंत राऊत (वय ४०, रा. राजेवाडी) असल्याचे समजले. घटनास्थळी पुरावे गोळा करताना राऊत यांचा अपघात नसून खून झाल्याचे पोलिसांना कळाले. राऊत यांच्या साथीदाराकडे अधिक चौकशी केली असता गणेश राऊत यांचे अप्पा ऊर्फ कैलास भरत जगताप यांच्याबरोबर पैशावरून वाद होता. बुधवारी (दि.१०) दुपारी दोघांमध्ये पैशावरून वादही झाला होता. रात्री ११.३० च्या दरम्यान राऊत हे आपल्या साथीदारासमवेत जेवण करून जात असताना त्यांच्या दुचाकीला अप्पा ऊर्फ कैलास जगताप याने लाथ मारून खाली पाडले. तसेच लोखंडी जड हत्याराने राऊत यांच्यावर वार करून त्यांचा खून केला. ही बाब कुणाला सांगशील तर जीवे मारून टाकेल, असा दम राऊत यांच्यासोबत असलेल्या साथीदाराला दिला. पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक सोनवलकर, गोतपगार, पो. हवालदार विलास मुत्तेमवार आदी कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Not an accident on Wagahpur-Malshiras road, murder