शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

'एकही उमेदवार नको', ४२ हजार ९४६ पुणेकरांची 'नोटा' ला पसंती, चिंचवड सर्वाधिक, इंदापूर सर्वात कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 12:47 IST

ईव्हीएम मशीनवर उमेदवारांच्या यादीच्या तळाशी ‘वरीलपैकी एकही नाही’ म्हणजेच नोटा, असा एक पर्याय असतो

पुणे : विधानसभा निवडणुकीत उमेदवार पसंत नसल्यास मतदारांना ‘नोटा’ला (यापैकी एकही उमेदवार नाही.) मते देण्याचा अधिकार आहे. मतमोजणीनंतर जिल्ह्यातील चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक ४ हजार ३१६ ‘नोटा’ला पसंती देण्यात आली आहे. तर त्यानंतर शहरातील वडगाव शेरी मतदारसंघातही ४ हजार २५९ मते ‘नोटा’ला पडली आहेत. पिंपरी मतदारसंघातही ‘नोटा’ला ४ हजार १३ मते मिळाली. तर सर्वांत कमी ६३४ मते इंदापूर मतदारसंघात पडली आहेत. एकूण ४२ हजार ९४६ पुणेकरांनी २०२४ च्या निवडणुकीत नोटाला पसंती दिल्याचे समोर आले आहे.  

‘नोटा’ला मिळालेली मते मतदारसंघनिहाय

जुन्नर : १३७६, आंबेगाव : ११५७, खेड-आळंदी : १६९२, शिरूर : २१८७, दौंड : १२११, इंदापूर : ६३४, बारामती : ७७९, पुरंदर : १४८४, भोर : २७२०, मावळ : २७१५, चिंचवड : ४३१६, पिंपरी : ४०१३, भोसरी : २६८५, वडगाव शेरी : ४२५९, शिवाजीनगर : २०४४, कोथरूड : ३१५२, खडकवासला : २९००पर्वती : २४६१, हडपसर : २९४६, पुणे कॅन्टोन्मेंट : १८१५, कसबा पेठ : १२१३. 

नोटा पर्यायाची सुविधा २०१४ पासून मिळत आहे. हा पर्याय उपलब्ध हाेताच, पहिल्याच निवडणुकीमध्ये बहुतांश ठिकाणी नोटाला सातव्या, आठव्या क्रमांकाची मते मिळाली हाेती. याच निवडणुकीत सर्वाधिक ४ हजार ४३५ मते पिंपरी मतदारसंघात मिळाली होती. विशेष म्हणजे, सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत नोटाला ३ मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची; तर ७ मतदारसंघात चौथ्या क्रमांकाची मते मिळाली हाेती.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी मतदारसंघात २०१४ मध्ये विजयी उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते नोटाला होती, तर २०१९ मध्ये दौंड मतदारसंघात विजयी उमेदवार राहुल कुल यांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते नोटाला होती. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाेटाला सर्वाधिक मते चिंचवड मतदारसंघात मिळाली. ही मते एकूण मतदानाच्या तब्बल २.११ टक्के अर्थात, ५ हजार ८७४ इतकी होती. याच निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातही एकूण मतदानाच्या २ टक्के अर्थात, ४ हजार २८ मतदारांनी नोटाला पसंती दिली होती.

नोटाचा पर्याय का?

मतदान हा प्रत्येकाचा महत्त्वाचा हक्क आणि अधिकार आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या या अधिकाराचा वापर केला पाहिजे, तरच लोकशाही टिकून राहील. चांगले राज्यकर्ते निवडून देण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, पण तुम्हाला निवडणुकीत उभा असलेला कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर तुम्ही नोटा हा पर्याय वापरू शकता. मतदान यंत्रावर (ईव्हीएम) निवडणुकीत उभा असलेला उमेदवार आणि त्याचा पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अशी यादी दिलेली असते. ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, त्याच्या चिन्हासमोरील बटण दाबून मतदान केले जाते. मात्र, यंत्रावरील उमेदवारांच्या यादीच्या तळाशी ‘वरीलपैकी एकही नाही’ म्हणजेच नोटा, असे लिहिलेले एक पर्याय देखील आहे. मतदारांना त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवणारा कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर मतदार नोटा हा पर्याय निवडू शकतो. याद्वारे मतदारांना सर्व उपलब्ध उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मिळतो.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४VotingमतदानEVM Machineईव्हीएम मशीनSenior Citizenज्येष्ठ नागरिकindapur-acइंदापूरchinchwad-acचिंचवड