नोटाबंदीचे बाजारावर सावट

By Admin | Updated: November 14, 2016 02:32 IST2016-11-14T02:35:44+5:302016-11-14T02:32:05+5:30

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले असून, बटाट्याचे भाव निम्म्याने घटले आहेत.

The nondescript market deteriorated | नोटाबंदीचे बाजारावर सावट

नोटाबंदीचे बाजारावर सावट


चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले असून, बटाट्याचे भाव निम्म्याने घटले आहेत.
बाजारात कांद्याची आवक ५५० क्विंटल होऊन प्रतिक्विंटल ११०० रुपये भाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याला ११०० रुपये भाव होता. मागील आठवड्यात कांद्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण ते स्थिरच राहिले. शिवाय बटाटा निम्म्याने घटल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यातच आणखी भर म्हणजे नोटा बदलांमुळे बाजारात मंदीचे सावट दिसून आले. वाटाणा, वांगी, भेंडी, दोडका, गवार, शेवगा या भाज्यांचे भाव तेजीत राहिले. हिरव्या मिरचीचे भाव स्थिर राहून मिरचीला ८० ते १०० रुपये प्रतिदहा किलोस भाव मिळाला.
शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा - एकूण आवक - ५५० क्विंटल. भाव क्रमांक १ - ११०० रुपये, भाव क्रमांक २ - ८०० रुपये, भाव क्रमांक ३ - ७०० रुपये. बटाटा - एकूण आवक ७०० क्विंटल. भाव क्रमांक १ - ११०० रुपये, भाव क्रमांक २ - ८०० रुपये, भाव क्रमांक ३ - ६०० रुपये. भुईमूग शेंग (जळगाव) व भुईमूग शेंगची (बंदूक) आवक बाजारात झाली नाही.
लसूण - एकूण आवक ४ क्विंटल. भाव क्रमांक १ - १२०० रुपये, भाव क्रमांक २ - ११०० रुपये, भाव क्रमांक ३ - ९०० रुपये.
फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे : हिरवी मिरची- २५५ पोती ( ८० ते १०० ) टोमॅटो - ४०० पेट्या ( ७० ते १२० रुपये ), कोबी - १९० पोती (३० ते ५० रुपये), फ्लॉवर -२२० पोती ( ८० ते १२० रुपये ), वांगी - २५० पोती ( १५० ते २५० रुपये), भेंडी- १८० पोती (२०० ते २५० रुपये), दोडका - ४५ पोती ( २०० ते ३०० रुपये ), कारली -२२५ डाग ( १०० ते १५० रुपये), दुधीभोपळा -१७० पोती ( ५० ते १०० रुपये), काकडी - १२५ पोती (८० ते १०० रुपये), फरशी -८९ पोती (१५० ते २०० रुपये), वालवर - ४९ डाग ( २५० ते ३००), गवार - ९५ डाग (३०० ते ४०० रुपये), ढोबळी - २३२ डाग (१०० ते २०० रुपये ), चवळी -१२० डाग (१०० ते २०० रुपये), वाटाणा - ३८ पोती (५०० ते ६०० रुपये) शेवगा - ४० डाग (४०० ते ५०० रुपये).

Web Title: The nondescript market deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.