शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

साडे बत्तीस तासांमध्ये तब्बल सोळा वेळा सिंहगड सर करत केले ' एव्हरेस्टिंग '

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 18:50 IST

जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर आहे. हे पूर्ण शिखर चढणे म्हणजे एव्हरेस्टिंग.

ठळक मुद्देपुण्यातच एव्हरेस्टइतकीच उंची सर करण्याचा उपक्रम

नितीन गायकवाड - पुणे : भटकंतीची आवड असणाऱ्या कोणालाही ''माऊंट एव्हरेस्ट '' चे नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यात गिर्यारोहण प्रांतातला कुणी असेल तर मग विचारता सोय नाही. पण तो सर करायचा म्हटलं तर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अशा सर्व पातळ्यांवर भक्कम तयारी करावी लागते. परंतू, पुण्यातील एका अवलियाने भन्नाट शक्कल लढवत एव्हरेस्ट इतकीच ८८४८ मीटर उंची तब्बल १६ वेळा सिंहगड घाटरस्त्याने अखंडपणे चढून (चालत, पळत) ३२ तास ३० मिनिटे वेळेत ‘एव्हरेस्टिंग’ हा अनोखा उपक्रम सिंहगडावर पूर्ण केला. ४९ वर्षीय आशिष कसोदेकर असे त्या फिनिशरचे नाव.. कसोदेकर यांनी २० फेब्रुवारी २०२० (२०/०२/२०२०) अशा या खास तारखेला काहीतरी जगावेगळे करण्याची ऊर्मी, प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर मेहनत घेऊन केलेल्या तयारीच्या जोरावर २० फेब्रुवारीला दुपारी २ वाजता सुरू केलेला हा खडतर प्रवास २१ फेब्रुवारीच्या रात्री १०.३० वाजता पूर्ण केला. या उपक्रमात त्यांना त्यांचे मित्र हरी, मंगेश, कौस्तुभ यांची मोलाची साथ मिळाल्याचे ते सांगतात. कुठल्याही परिस्थितीत माघार न घेता अशाच स्पेशल तारखांना असे जगावेगळे उपक्रम करण्याची आशिष यांची खासियत आहे. आतापर्यंत त्यांनी ११/११/११ या तारखेला पुणे ते गोवा असा सायकलप्रवास २२ तासांत पूर्ण केला. १२/१२/१२ या दिवशी पुणे ते पाचगणी हा प्रवास चालत २३ तासांत पूर्ण केला आहे तर ११/१२/१३ या तारखेला सुरू केलेला नॉनस्टॉप ३६ तास बाइक चालवत  प्रवास पूर्ण केला. त्याचबरोबर ‘ला अल्ट्रा’  लडाखमधील ५५५ किमीची शर्यत १२६ तासांत पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय स्पर्धक आहेत.‘‘जगाचा विचार न करता स्वत:ला आवडणाऱ्या  गोष्टी केल्या तर त्यात यश मिळते’’, असा संदेश ते तरुणाईला देतात. आशिष कसोदेकर यांची या वयातील इच्छाशक्ती आणि उत्साह वाखणण्याजोगा आहे. ते एका ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक असून ते अ‍ॅडव्हेंचर टूर्स आयोजित करतात.  ..........‘एव्हरेस्टिंग म्हणजे काय?जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर आहे. हे पूर्ण शिखर चढणे म्हणजे एव्हरेस्टिंग. किल्ले सिंहगडची उंची ५६३ मीटर असून आशिष कसोदेकर यांनी १६ वेळा सिंहगड घाटरस्त्याने अखंडपणे चालून-पळून एव्हरेस्टइतकीच ८८४८ ही उंची ३२ तास ३० मिनिटे वेळेत पूर्ण केली.

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाEverestएव्हरेस्टTrekkingट्रेकिंग