बँकेत खाते नसलेले हादरले

By Admin | Updated: November 16, 2016 02:22 IST2016-11-16T02:22:48+5:302016-11-16T02:22:48+5:30

ज्या व्यावसायिकांनी बँकेत चालू खाते काढलेले नाही अथवा प्राप्तिकरही भरला नाही असे व्यावसायिक सध्या धास्तावले आहेत. नोटा बदलाबाबत असे

Non-bank shockers | बँकेत खाते नसलेले हादरले

बँकेत खाते नसलेले हादरले

चिंचवड : ज्या व्यावसायिकांनी बँकेत चालू खाते काढलेले नाही अथवा प्राप्तिकरही भरला नाही असे व्यावसायिक सध्या धास्तावले आहेत. नोटा बदलाबाबत असे व्यापारी चिंतेत आहेत. सोशल मीडियातून येणारे उलट-सुलट मेसेज अशा व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आता व्यवसाय कसा करायचा या चिंतेत अनेक जण दुकाने बंद ठेवत आहेत.
नोटा बदलण्याच्या निर्णयाबाबत व्यापारी वर्गामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याने सुट्या पैशांच्या तुटवड्याने दैनंदिन व्यवहार थंडावले आहेत. बंद झालेल्या नोटा बँकेत भरता येणार असल्या, तरी सध्या येणाऱ्या ग्राहकांकडून अशा नोटा घ्यायच्या की नाही या द्विधा मन:स्थितीत व्यापारी अडकले आहेत.
गरजेच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेत जातात. मात्र, बंद झालेल्या नोटा व सुट्या पैशांची कमतरता यामुळे अडचणी येत आहेत. काही जण अजूनही बंद झालेल्या नोटा स्वीकारत असल्याने इतर व्यावसायिक या प्रकाराबाबत उलटसुलट चर्चा करीत आहेत. ग्राहक परत जाण्यापेक्षा मालाची विक्री करण्याकडे काही व्यावसायिक लक्ष देत आहेत. जुनी उधारी गोळा करण्याचे प्रकार जोमात आहेत. ५०० व १००० च्या नोटा भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत असल्याने अनेक जण आपापल्या पद्धतीने नोटा स्वीकारत आहेत. नोटा भरण्याच्या प्रक्रियेबाबत गैरसमज असल्याने अनेक व्यापारी चिंतेत आहेत. सोशल मीडियावर येणारे उलटसुलट मेसेज दिशाभूल करीत आहेत. बँकेत कशा प्रकारे व किती पैसे भरता येतात याबाबत अनेकांना माहिती नसल्याने हाच चर्चेचा विषय ठरत आहे.(वार्ताहर)

Web Title: Non-bank shockers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.