शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

करवाढ नाही; ६५ कोटी ५८ लाख रुपयांची तरतूद, आळंदीचा अर्थसंकल्प सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 13:27 IST

यंदाच्या वर्षी लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय स्तरावरच निर्णय

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी नगरपालिकेने सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा ६५ कोटी ५८ लाख रुपये अंदाजपत्रकीय तरतूद असलेला ४ लाख ५७ हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला आहे. करवाढ नसलेला अर्थसंकल्प असला तरी भामा आसखेड धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे विद्युत बिल, पालिकेचे पाणीपुरवठा केंद्राचे विद्युत बिल आणि पाण्याच्या रॉयल्टीसाठी जादाची २ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद कली आहे.

 यंदाच्या वर्षी लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय स्तरावरच निर्णय घेण्यात आला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, लेखापाल विभागातील देवश्री कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्थसंकल्प तयार करण्यात आला. या अंदाजपत्रकास प्रशासक तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी मंजुरी दिली असून अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. अन्य कोणतीही करवाढ नसल्याचा दावा पालिकेच्यावतीने प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तर पालिकेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून येणारा दहा लाख रुपयांचा पहिला टप्पा अपेक्षित जमा रकमेत तरतूद केली. पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठीच्या वीजबिलाची रक्कम अदा करण्यासाठी १ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली आहे.          पाणीपुरवठा विभागातील भामा आसखेड धरणातून येणाऱ्या पाण्याच्या रॉयल्टीसाठी १ कोटी रुपये खर्चाची स्वतंत्र तरतूद आहे. तर, थेट भामा आसखेड धरणातून शुद्ध पाणी येत असल्याने मागील वर्षी शुद्धीकरणास खर्च झाला नाही. हा खर्च कमी झाल्याने दोन कोटींची तरतूद पाणीपुरवठा विभागातील मागील बिलाची देयक देण्यासाठी ठेवली. विद्युत विभागासाठी चाळीस लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे. तसेच शहरातील विकासाची मोठी कामे शासनाच्या नगरोत्थान योजना जिल्हास्तरावर सात कोटी, नागरी दलितेतर सुधारणा योजनेतून ९० लाख रुपये, रस्ता अनुदान ३७ लाख रुपये, विशेष अनुदान एक कोटी, दलितवस्ती सुधार योजना ३ कोटी रुपये, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून भूसंपादन व इतर कामासाठी ५ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी १० कोटी, वैशिष्ट्यपूर्ण खर्चाची तरतूद कामे योजना अनुदान दीड कोटी या शासनाच्या निधीवर अवलंबून आहेत.

खर्चाची तरतूद 

- आस्थापना - ५ कोटी ६८ लाख रुपये- प्रशासकीय ३ कोटी २९ लाख रुपये- बांधकाम १ कोटी ५० लाख रुपये-  हंगामी कर्मचारी १ कोटी ५० लाख रुपये- घन कचरा व्यवस्थापन व आरोग्य विभाग १ कोटी रुपये- ठेका पद्धतीने कचरा उचलणे- १ कोटी ५० लाख रुपये-  महिला व बालकल्याण ६ लाख ५० हजार रुपये-  दिव्यांग कल्याणनिधी- ६ लाख ५० हजार रुपये- ज्येष्ठांसाठी- ३ टक्के निधी

अर्थसंकल्प दृष्टिक्षेपात

- अंदाजपत्रकीय तरतूद : ६५ कोटी ५८ लाख रुपये- आरंभीची रक्कम : ११ कोटी २४ लाख ९१ हजार ६१२ रुपये- महसूली जमा : १५ कोटी ३५ लाख ६५ हजार रुपये- भांडवली जमा : ३८ कोटी ९८ लाख ४० हजार रुपये- एकूण अपेक्षित जमा रक्कम: ५४ कोटी ३४ लाख ५ हजार रुपये- महसुली खर्च : २४ कोटी ५३ लाख ३४ हजार रुपये- भांडवली खर्च : ४० कोटी १ लाख १३ हजार ९०० रुपये- एकूण तरतूद : ६५ कोटी ५४ लाख ३८ हजार रुपये- शिल्लक : ४ लाख ५७ हजार रुपये

अपेक्षित उत्पन्न

- संकलित कर : ४ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी: ४५ लाख रुपये- बांधकामावरील विकास शुल्क : १ कोटी १० लाख रुपये- पालिका सहायक अनुदान: २ कोटी ६४ लाख रुपये,- यात्रा अनुदान : १ कोटी ७० लाख रुपये- इमारत भुईभाडे : ६० लाख रुपये- यात्रेत पालिकेच्या जागांच्या लिलाव बाजारातून वसुली : १६ लाख रुपये- वाहनतळातून : ६५ लाख रुपये- सर्वसाधारण विशेष स्वच्छता कर : १८ लाख रुपये

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीBudgetअर्थसंकल्प 2023MONEYपैसा