शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

Devendra Fadnavis: महिला आणि बालकांच्या गुन्ह्यात समझोता नको, जर कोणी पोलीस आढळल्यास बडतर्फ- फडणवीसांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 16:55 IST

पुणे शहरात प्रचंड वेगाने नागरीकरण होऊ लागल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे

पुणे: राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. पॉक्सोच्या केसेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रग्सच्या केसेसही बाहेर येऊ लागल्या आहेत. समाजात गुन्हेगारी प्रवूत्ती आहे. तोपर्यंत गुन्हे घडत राहतील. मात्र पोलिसांनी महिला आणि बालकांच्या गुन्ह्यात समझोता नको. तसेच अमली पदार्थ गुन्ह्यात जर कोणी पोलीस आढळला तर बडतर्फ केले जाईल असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिला आहे.  पुणे शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत मंजूर झालेल्या नवीन सात पोलिस ठाण्यांचे उदघाटन शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

फडणवीस म्हणाले,  पुणे हे अर्थव्यवस्थाचे इंजिन आहे, प्रचंड वेगाने नागरीकरण होणारे शहर आहे. शहरात आव्हाने वाढत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. पोलीस आस्थापना बाबतीत 1960 साली निर्णय झाला. जवळपास 63 वर्षांनी नवीन आकृती बंध तयार केला. नवीन पोलीस ठाणे आम्ही तयार करत नव्हतो. 2014 पासून ते मी काम केले. पुण्यात हा मोठा रेकॉर्ड आहे की 7 पोलीस ठाणे उद्घाटन केली आहेत. गुणात्मक पोलिसिंग आपण करतो आहोत. सीसीटीव्ही फेज 2 उद्घाटन करतो आहे. आपण सेफ शहरासाठी काम केले आहे. नवीन कॅमेरे लागल्याने फायदा होणार आहे. 

सायबर सुरक्षा आता महाराष्ट्र मध्ये अत्याधुनिक मशीन बसवले आहेत. त्यामुळे विविध सायबर गुन्हे उघडकीस येणार आहे. आरोपी पकडण्यासाठी खूप तंत्रज्ञान वापरावे लागले. तुम्ही जर फीड दिला तर व्यक्ती सापडू शकेल, सायबर सेंटरमध्ये तयार केली आहे. सर्व कॅमेरे एकत्रीकरण करणे गरजेचे आहे. ड्रोन कॅमेरे देखील आता वापरले जाणार आहेत. ब्लॅक स्पॉट वर नाईट व्हिजन कॅमेरा लावता येतील त्यासाठी प्रयत्न करायला हवा. वाहतूक खूप असून पुण्याला ऍडिशनल सिपी, एक डीसीपी देणार आहे. पुणे- पिंपरी चिंचवड मध्येही पोलीस आयुक्तालय वेगाने तयार करणार. 40 हजार पोलीस भरती झाली आहे, माझ्या काळात सर्वात जास्त भरती केली. त्यामुळे पोलिसांमध्ये कमतरता राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

ही आहेत नवीन सात पोलिस ठाणे...

आंबेगाव, नांदेडसिटी, बाणेर, खराडी, वाघोली, फुरसुंगी आणि काळेपडळ ही नवीन सात पोलिस ठाणी शुकवारपासून सुरू होत आहेत. पोलिस आयुक्तालयातील भारती विद्यापीठ, सिंहगडरोड, चतुःशृंगी, लोणीकाळभोर, लोणीकंद, हडपसर, वानवडी, कोंढवा, चंदननगर तसेच पुणे ग्रामीणमधील हवेली या दहा पोलिस ठाण्यांचे विभाजन करून ही नवीन पोलिस ठाणी सुरू होत आहेत.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPolice Stationपोलीस ठाणेPoliticsराजकारणHome Ministryगृह मंत्रालय