शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पिंपरी-चिंचवड झोपडपट्टीत कोरोनाचे नाही गांभीर्य; सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 12:41 IST

एकत्र येऊ नका असे आवाहन केले जात असताना झोपडपट्टीतील नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे समोर...

ठळक मुद्दे पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा धोका वाढलामहापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या कडक उपाययोजनामुळे १२ रुग्ण झाले कोरोनामुक्त

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, विळखा आणखीनच घट्ट होत आहे. संचारबंदीच्या कालखंडात झोपडपट्टीत सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत. एकत्र येऊ नका असे आवाहन केले जात असताना झोपडपट्टीतील नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत 'लोकमत'ने शहरातील झोपडपट्ट्यांची पाहणी केली. त्यात सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा धोका वाढला आहे. ११ मार्चला तीन रुग्ण सापडले होते. त्यानंतर ही संख्या महिनाभरात ३५ वर पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या कडक उपाययोजनामुळे १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. मात्र, एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. सध्या महापालिका रुग्णालयात २३ रुग्ण दाखल आहेत.----------------------मरकजमधील सहभागी नागरिकांमुळे वाढला संसर्ग    पिंपरी-चिंचवड परिसरात २० मार्चनंतर सलग दहा दिवस एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. मात्र, एप्रिलच्या पहिल्या दिवसापासून रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात नऊ रुग्ण सापडले आहेत. त्यात मरकझमधील धार्मिक कार्यक्रमातून आलेले आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या अधिक आहेत. सामाजिक संसर्गास शहरात सुरुवात झाली आहे.  ----------------------------तबलिगींच्या संपर्कात आलेल्यांचा शोधमहापालिकेच्या वतीने परदेशातून आलेल्या प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबांवर लक्ष ठेवले आहे. तसेच दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलिगींचा शोध प्रशासन घेत आहे. क्वारंटाइन केलेल्या नागरिकांसाठी सुमारे तीनशे टीम तयार केल्या आहेत. आलेले प्रवासी त्यांची ट्रॅॅव्हल हिस्ट्री तपासून त्यांना होम क्वारंटाइन केले आहे. होम क्वारंटाइनमध्ये असणाºया नागरिकांवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे.-------------------------शहरात ३७ घोषित आणि अघोषित ३४ अशा झोपडपट्ट्यांची संख्या आहे. झोपडपट्ट्यांत सुमारे दोन लाख नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, लॉकडाऊनचा परिणाम या झोपडपट्ट्यांत जाणवत नाही. लोकमतने पिंपरीतील खराळवाडी, चिंचवड आनंदनगर, पॉवर हाऊस चौक, संजय गांधीनगर, वाकड-खडकवस्ती, भोसरीतील महात्मा फुलेनगर, बिजलीनगर येथील नागसेननगर, प्राधिकरणातील ओटा स्किम अशा झोपडपट्ट्यांच्या भागांची पाहणी केली. त्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसून आले.----------------------------पाहणीतील निष्कर्ष१) संचारबंदीचे सर्रास उल्लंघन, चारपेक्षा अधिक जणांनी एकत्र येऊ नये, असे निर्देश असाताना नागरिक घोळक्याने जमत आहेत.२) सामाजिक संस्थांच्यावतीने मदत वाटण्यासाठी कोणी आल्यास गर्दी करीत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही.३) सार्वजनिक ठिकाणी ये-जा करताना मास्क अनिवार्य केला आहे. मात्र, झोपडपट्ट्यांत मास्क वापरणाºयांचे प्रमाण कमी आहे.४) घोळक्याने बसून नये; मात्र झोपडपट्ट्यांत नागरिक चारपेक्षा जास्त एकत्र येऊन गप्पा मारत असताना दिसत आहेत.५) सामाजिक संसर्ग होऊ नये, एकमेकांशी बोलताना एक मीटर अंतर ठेऊन बोलावे, असे असताना नागरिक या नियमांचे उल्लंघन करीत आहेत.------------------------------खराळवाडी : पिंपरीतून भोसरीकडे जाणाºया रस्त्यावर खराळवाडी झोपडपट्टी आहे. येथे मोठ्या प्रमाणावर सायंकाळी सहाच्या सुमारास लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक रस्त्यांवर दिसून आले. एका संस्थेच्यावतीने मदत आली असताना ती घेण्यासाठी झुंबड उडाली होती. तसेच पारावर काही ज्येष्ठ नागरिक बसल्याचे दिसून आले.-------------------------------आनंदनगर, चिंचवड : पिंपरीतून चिंचवड स्टेशनकडे जात असताना आनंदनगर झोपडपट्टी आहे. अंतर्गत परिसरात दुचाकी घेऊन नागरिक फिरताना दिसत आहेत. तसेच बंद दुकानांच्या बाहेर काही नागरिक दिसून आले. तसेच महिला-मुले घराबाहेर फिरताना दिसले. सायंकाळच्या वेळी घराबाहेर येणाºयांचे प्रमाण अधिक दिसले. उकाड्याचे दिवस आहेत, त्यामुळे घरात बसणे कठीण झाले आहे, असे काही नागरिकांनी सांगितले.-----------------------------लांडेवाडी, भोसरी : भोसरीतील लांडेवाडी चौकात झोपडपट्टी आहे. सायंकाळच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसून आले. तसेच महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक झोपड्यांमधून घराबाहेर येत असल्याचे दिसून आले. तसेच पिण्याचे पाणी आल्यानंतर सार्वजनिक नळांवरही महिला गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर