कारवाईचे अधिकार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST2021-01-03T04:12:20+5:302021-01-03T04:12:20+5:30

आम्हाला रस्त्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. एखाद्या हॉटेलमध्ये आत जाऊन कारवाई करता येत नाही. - पोलिस खाते --- पथक ...

No right to action | कारवाईचे अधिकार नाहीत

कारवाईचे अधिकार नाहीत

आम्हाला रस्त्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. एखाद्या हॉटेलमध्ये आत जाऊन कारवाई करता येत नाही.

- पोलिस खाते

---

पथक नाही

असे पथक तयार केलेले नाही. मात्र नियम आहेत, त्याचे पालन केले पाहिजे हेही खरे. नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करावी.

-महापालिका आरोग्य विभाग

--

अन्न पदार्थाची तक्रार असेल तरच कारवाई

टेबल एका आड एक बसवत नाहीत म्हणून आम्हाला कारवाई करता येणार नाही. तसा अधिकार नाही. अन्न पदार्थांविषयीची काही तक्रार असेल तर आम्ही त्याचा नमुना प्रयोगशाळेत तपासून कारवाई करू शकतो

- अन्न व औषध प्रशासन

---

बाटलीबंद पाणी दिले जाते म्हणून आम्हाला कारवाई करता येणार नाही, मात्र छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत घेत असेल तर त्यावर आम्ही कारवाई करू. तशी तक्रार यायला हवी.

- वजन व मापे प्रशासन

Web Title: No right to action