शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

‘शिवनेरी’तील सुविधांना घरघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 07:00 IST

सुमारे दहा वर्षांपुर्वी शिवनेरी बससेवा सुरू

ठळक मुद्दे चार महिन्यांपुर्वी तिकीट दरात कपात करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रतिसाद आणखी वाढला स्वारगेट व पुणे स्टेशन बसस्थानकातून प्रत्येक १५ मिनिटांला दादरसाठी शिवनेरी बस

पुणे : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील प्रतिष्ठेच्या शिवनेरी बसला पुणे-मुंबईदरम्यान प्रवाशांची पहिली पसंती मिळते. पण अनेक बस जुन्या झाल्याने प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळत नाही. अधूनमधुन विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच चाजिंग पॉईंट बंद असणे, पडदे नसणे, खराब आसनव्यवस्था आदी तक्रारींची भर पडत आहे. काहीवेळा रस्त्यातच बस बंद पडण्याचे प्रकारही घडत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.महामंडळाने पुणे-मुंबईदरम्यान प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा, यासाठी सुमारे दहा वर्षांपुर्वी शिवनेरी बससेवा सुरू केली. सध्या एसटीच्या पुणे विभागाकडे एकुण ६६ शिवनेरी बस असून त्यापैकी ४६ बस मालकीच्या तर २० बस भाडेतत्वावरील आहेत. या बसच्या माध्यमातून दादर, ठाणे, बोरिवली, औरंगाबाद व नाशिक या मार्गांवर बस धावतात. दररोज दोन्ही बाजुने ३०० हून अधिक फेºया होत आहेत. वातानुकूलित व आरामदायी सेवेमुळे या बसला प्रवाशांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे स्वारगेट व पुणे स्टेशन बसस्थानकातून प्रत्येक १५ मिनिटांला दादरसाठी शिवनेरी बस सोडण्यात येते. ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठीही १५ ते ३० मिनिटांनी बस सुटते. तसेच चार महिन्यांपुर्वी तिकीट दरात कपात करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रतिसाद आणखी वाढला आहे. मात्र, एकीकडे प्रवाशांच्या पसंतीची मोहोर उमटलेली असताना सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. एसटीच्या मालकीच्या बसपैकी अनेक बसचे आयुर्मान ८ वर्षांहून अधिक झाले आहे. तर अनेक बस १२ लाखांहून अधिक किलोमीटर धावल्या आहेत. त्यामुळे या बसमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. वातानुकूलित यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रकार घडत आहेत. काही बस मार्गावरच बंद पडत आहेत. बसच्या खिडक्यांचे पडदे, आसनांचे कव्हर खराब असल्याचे दिसून येते. जुन्या बसमधील आसनांची स्थितीही ‘आरामदायी’ म्हणावी, अशी नसते. काही बसमधील चार्जिंग पॉईंट जवळपास बंद असल्याची स्थिती आहे. दादर ते स्वारगेटदरम्यान प्रवासासाठी ४६० रुपये तिकीट दर आकारला जातो. या दराच्या तुलनेत सुविधाही चांगल्या मिळाव्यात अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.------------------सध्याचे शिवनेरी बससेवेचे मार्ग व तिकीट दर१. पुणे स्टेशन ते दादर (औंधमार्गे) - ४४० रु.२. पुणे स्टेशन ते दादर (पिंपरी चिंचवड मार्गे) - ४४० रु.३. स्वारगेट ते दादर - ४६० रु.४. स्वारगेट ते ठाणे (एरोली मार्गे) - ४४० रु.५. स्वारगेट ते बोरिवली (सायन मार्गे) - ५२५ रु.६. स्वारगेट ते बोरिवली (पवई मार्गे) - ५२५ रु.७. पुणे ते औरंगाबाद - ६५५ रु.८. पुणे ते नाशिक - ६०५ रु.---------------------------स्वारगेट आगाराकडील शिवनेरी -मालकीच्या - १८भाडेतत्वावरील - ११एकुण - २९पुर्नबांधणीसाठी प्रस्तावित - ७-----------------शिवाजीनगर आगाराकडील शिवनेरी -मालकीच्या - २८भाडेतत्वावरील - ९एकुण - ३७पुर्नबांधणीसाठी प्रस्तावित - १४----------------भाडेतत्वावरील शिवनेरी बसच्या देखभाल दुरूस्तीचे काम एसटीकडे नसते. त्यामुळे त्यांच्या बसबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असतात. भाडेतत्वावरील बहुतेक बस नवीन असल्याने तक्रारींचे प्रमाण कमी आहे. तर एसटीकडील काही बस जुन्या असल्या तरी त्यांची देखभाल-दुरूस्ती एसटीकडेच आहे. त्यामुळे प्रवाशांच्या फारशा तक्रारी नसतात. काही बस जुन्या असल्याने या बसमध्येच काही असुविधा आढळत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.जुन्या बसची पुर्नबांधणीएसटी महामंडळाने ८ वर्षांहून अधिक कालावधी झालेल्या शिवनेरी बसची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पुणे विभागातील सुमारे २० बसचा समावेश आहे. बोपोडी येथील वर्कशॉपमध्ये हे काम होईल. यामध्ये बसची आसने, वातानुकूलित यंत्रणा, इंजिन यांसह आवश्यकतेनुसार बदल केले जाणार आहेत. पुर्नबांधणीनंतर या बस पुन्हा मार्गावर येतील.विभागातील जुन्या शिवनेरी बसची पुर्नबांधणी केली जाणार आहे. या बस एसटीच्या मालकीच्या आहेत. पुर्नबांधणीनंतर बस पुन्हा मार्गावर येतील. आता यापुढे एसटीकडून शिवनेरीसाठी भाडेतत्वावरच बस घेतल्या जाणार आहेत. - यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईTravel Tipsट्रॅव्हल टिप्स