शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधल्या मेंदूज्वराचा धोका पुण्याला नाही : बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 12:15 IST

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे शंभरपेक्षा जास्त बालके दगावली.

ठळक मुद्देघाबरण्याचे कारण नाहीबिहारमधील मेंदूज्वर अस्वच्छता, त्यातून होणारा विषाणू व जीवाणूंचा प्रसारामुळे अस्वस्थ वाटणे, ताप येणे, उलट्या होणे, चक्कर येणे, झटके येणे यांसारखी त्याची लक्षणे बिहारमधून कामानिमित्त पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी

पुणे : बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे शंभरपेक्षा जास्त बालके दगावली. त्यामागे अस्वच्छतेतून होणारा विषाणू व जीवाणूंचा प्रसार, लिची फळाचा आहारात अनुचित समावेश, उष्माघात ही कारणे त्यामागे आहेत. या विषाणूंना प्रतिबंध करणाऱ्या लसींबाबत जागरूकता न झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. विषाणूंमुळे पसरणारा हा आजार असला तरी पुण्याला मात्र या आजाराचा धोका नाही, असे स्पष्टीकरण बालरोगतज्ञांनी दिले आहे.मेंदूज्वरामुळे बालके दगावल्याच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. बिहारमधून कामानिमित्त पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या माध्यमातून बिहारमधल्या आजाराची साथ पुण्यात पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भाने बिहारमधल्या आजाराचा संसर्ग पुण्याला धोका नसल्याचा निर्वाळा बालरोगतज्ञांनी ‘लोकमत’कडे व्यक्त दिला.डॉ. जयंत नवरंगे म्हणाले, पुण्यात मेंदूज्वराच्या एक-दोन केसेस असू शकतात. पण त्या साथीच्या आजारामुळे नाहीत. मुळात मेंदूज्वराचे दोन प्रकार आहेत. एक अतिउष्णता म्हणजे उष्णतेच्या लाटेमुळे मेंदूज्वर (ब्रेन फिव्हर) झालेला आहे. यात मेंदूच्या पेशींना सूज येते. याचबरोबर लिचीच्या फळानेही देखील हे होऊ शकते. कुपोषित मुलांनी जर ही फळे खाल्ली तर रक्तातील साखर कमी होते. अस्वस्थ वाटणे, ताप येणे, उलट्या होणे, चक्कर येणे, झटके येणे आणि भान हरपून कोमामध्ये जाणे ही त्याची लक्षणे आहेत. तुरळक प्रमाणात साथीचे आजार चालूच असतात. पण साथीच्या आजाराच्या स्वरूपात जेव्हा हे चालत येते तेव्हा त्याचे मूळ कारण शोधावे लागते. गोरखपूरला असाच साथीचा आजार बळावला होता. जॅपनीज बी नावाचा जपानी व्हायरस असतो. तो पुणे जिल्ह्याला होण्याची शक्यता वर्तविली जाते. मात्र त्याची लस उपलब्ध आहे. एक ते दहा वर्षाच्या मुलांनी ही लस टोचून घ्यावी. डॉ. दिलीप सारडा यांनी बिहारमधील मेंदूज्वर अस्वच्छता, त्यातून होणारा विषाणू व जीवाणूंचा प्रसारामुळे उदभवलेला असू शकतो. याची लसही उपलब्ध आहे; मात्र त्याविषयीच्या जागरूकतेच्या अभावामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBiharबिहारHealthआरोग्यdoctorडॉक्टर