पुणे : बसची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी सद्यस्थितीत पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) ला पार्किंगसाठी जागा मिळत नाही.रस्त्यावर कुठेही बस उभ्या केल्याने वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असून हा दंड चालकांच्या वेतनातून कपात करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. हा भुर्दंड माथी मारल्याने चालकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पुढील वर्षभरात पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नवीन बस दाखल होणार आहेत. तर सध्या मालकीच्या व भाडेतत्वावरील जवळपास २ हजार बस आहेत. पण या बस पार्किंग करण्यासाठी पीएमपीकडे आवश्यक जागा उपलब्ध नाही. आगार तसेच बसस्थानकालगतच्या मुख्य रस्त्यांवरच बस उभ्या कराव्या लागतात. या बसमुळे अनेकदा वाहतुक कोंडीही होते. डेंगळे पुलालगतच्या महापालिकेकडे जाणाऱ्या दोन्ही बाजुला बस उभ्या केल्या जातात. याठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते.
नो पार्किंगचा भुर्दंड चालकांच्या माथी : पीएमपी प्रशासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 19:47 IST
वाहतुक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असून हा दंड चालकांच्या वेतनातून कपात करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.
नो पार्किंगचा भुर्दंड चालकांच्या माथी : पीएमपी प्रशासन
ठळक मुद्देपार्किंगला मिळेना जागा, पोलिसांची कारवाईभुर्दंड माथी मारल्याने चालकांमध्ये नाराजी निर्माण