शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोणीही उपाशीपोटी झोपू नये - श्रीनिवास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 03:02 IST

इस्कॉनच्या मदतीने टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमने सुरू केलेला रोज २० हजार खिचडी पॅकेटच्या वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद आहे.

कोरेगाव पार्क : इस्कॉनच्या मदतीने टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमने सुरू केलेला रोज २० हजार खिचडी पॅकेटच्या वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजातील एकही व्यक्ती उपाशीपोटी झोपू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्तकेले.टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे (टीएमसी) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया मान्यवरांना विमाननगर येथील सिम्बायोसिस एज्युकेशन कॉम्प्लेक्सच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर टीएमसीचे अध्यक्ष बी. आर. मल्होत्रा, सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आणि सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, सचिव डॉ. जयसिंग पाटील, वेकफिल्ड फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी मल्होत्रा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पाटील म्हणाले की, एकीकडे आपला देश महासत्ता बनण्याकडे वाटचाल करीत असताना, दुसºया बाजूला समाजातील गरीब लोकांची संख्या मोठी आहे. त्यातील अनेकजण उपाशीपोटी झोपतात. अशावेळी आपल्यातील संवेदनशील वृत्ती जागी ठेवून त्यांच्या पोटात अन्नाचे दोन घास जावेत, यासाठी प्रयत्न केला पाहिजे.मुजुमदार यांनी मनोगत व्यक्त केले. मल्होत्रा यांनी प्रास्ताविक केले. जयसिंग पाटील यांनी सूत्रसंचालन केले.नोबेल पुरस्कारप्राप्त गुरुत्वीय लहरीच्या संशोधकांच्या टीममधील डॉ. संजीव धुरंधर, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप (रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी), 'आयसर'चे संचालक डॉ. के. एन. गणेश यांना विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी, प्रादेशिक परिवहन अधिकारी बी. आय. आजरी, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, विमानतळ प्राधिकरण संचालक अजयकुमार यांना प्रशासकीय सेवेसाठी, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. हेमंत वाकणकर, कोलंबस रुग्णालयाचे सरव्यवस्थापक डॉ. विजूराजन यांना आरोग्य सेवेसाठी, सुदर्शन जीन्सचे बन्सल सुदर्शन, सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांना उद्योगक्षेत्रातील कामगिरीसाठी, क्रिकेटपटू पूनम राऊतला खेळासाठी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना कलेसाठी, सूर्यदत्ता एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया यांना शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल, विधिज्ञ चंदन परवानी (कायदा) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आज का आनंदचे संपादक श्याम अगरवाल आणि नीलकंठ ज्वेलर्सचे दिलबाग यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया कर्तबगार व्यक्तींना सन्मानित केल्याने इतरांसमोर आदर्श निर्माण होतो. अशा यशवंतांकडून प्रेरणा घेऊन जिद्दीने काम करण्याची स्फूर्ती मिळते. समाजातील वंचित घटकांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा.- श्रीनिवास पाटील

टॅग्स :Puneपुणे