शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे... ‘असे’ वागणे खपवून घेतले जाणार नाही : महापौरांचा निर्वाणीचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 20:23 IST

मराठा समाजाचे आरक्षण हा विषय राजकीय नाही तर सामाजिक आहे याचेही भान विरोधकांना राहिलेले नाही. यापुढे अशी गैरवर्तणूक खपवून घेतली जाणार नाही. वेळप्रसंगी कारवाईही करू असा इशारा महापौरांनी दिला. 

ठळक मुद्देभारतीय जनता पार्टीचाही मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबाच आहे. सरकार त्यासाठी प्रयत्नशील

पुणे: भारतीय जनता पार्टीचाही मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबाच आहे. सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, तो विषय उपस्थित करण्याचे महापालिका सभा हे व्यासपीठ नाही. विरोधकांना पुण्याच्या विकासाचे विषय मांडू द्यायचे नाहीत, त्यामुळेच ते गोंधळ घालून काम बंद पाडत आहेत. यापुढे असले वागणे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा महापौर मुक्ता टिळक व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिला.महापालिकेच्या गुरूवारी झालेल्या सभेत विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मनसे यांनी घातलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महापौर टिळक तसेच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आपली भूमिका व्यक्त केली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ तसेच भाजपाचे अन्य काही नगरसेवक यावेळी उपस्थित होते. काँग्रेस राष्ट्रवादीला त्यांच्या सत्तेच्या काळात याविषयात काहीही करणे जमलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. भाजपाने या विषयाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे महापालिकेच्या व्यासपीठावर हा विषय आणण्याचे काहीच कारण नाही. तरीही बुधवारी याविषयावरून सर्वपक्षीय संमतीने सभा तहकूब केली होती. तरीही गुरूवारी पुन्हा त्याच विषयावर असा गोंधळ घालणे याचा अर्थ विरोधकांना पुण्याच्या विकासाचे विषय सभेत येऊ द्यायचे नाहीत, ते मंजूर होऊ द्यायचे नाहीत असाच होतो अशी टीका यावेळी करण्यात आली. मराठा समाजाचे आरक्षण हा विषय राजकीय नाही तर सामाजिक आहे याचेही भान विरोधकांना राहिलेले नाही. त्यांच्या प्रभागातील नागरिकांनी त्यांना पुणे शहराचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिले आहे. महापालिकेचे सभेचे व्यासपीठ त्यासाठी आहे. तिथे मराठा आरक्षणाचा विषय उपस्थित करणे म्हणजे आपल्याच मतदारांशी प्रतारणा करणे आहे, हे विरोधकांना कळलेले दिसत नाही असे महापौर म्हणाल्या. प्रत्येक सभेत काही ना काही कारण काढून कामकाज करणे अवघड केले जात आहे. यापुढे अशी गैरवर्तणूक खपवून घेतली जाणार नाही, वेळप्रसंगी कारवाईही करू असा इशारा महापौरांनी दिला. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका