शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

सचिनच्या मुलाखतीला तरुणांना नाे एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 7:10 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मिशन यंग अॅण्ड फिट इंडिया ही माेहिम राबविण्यात येणार अाहे. या माेहिमेच्या उद्घाटन साेहळ्यात सचिन तेंडुलकर यांची मुलाखत हाेणार अाहे. परंतु या मुलाखतीला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मिशन यंग अॅण्ड फिट इंडिया ही माेहीम सुरु करण्यात येणार अाहे. याच्या उद्घाटन समारंभात क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर यांची मुलाखत घेण्यात येणार अाहे. त्यांच्या मुलाखतीतून विद्यार्थ्यांना व्यायामसाठी तसेच खेळासाठी प्राेत्साहन मिळू शकते परंतु या उद्घाटन साेहळ्याला विद्यार्थ्यांनाच प्रवेश नसल्याने सचिनच्या मुलाखतीतून नेमके काेणाला प्राेत्साहन मिळणार असा प्रश्न अाता उपस्थित केला जात अाहे.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अावारातील अायुकामधील चंद्रशेखर सभागृहात साेमवारी दुपारी 2 वाजता सचिन तेंडुलकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम हाेणार अाहे. याबाबतची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. अरविंद शाळीग्राम यांनी शुक्रवारी अायाेजित पत्रकार परिषदेत दिली हाेती.  तेंडुलकर यांची मुलाखत प्रसिद्ध क्रीडा समीक्षक सुनंदन लेले घेणार अाहेत. या कार्यक्रमाला विद्यापीठाने निमंत्रित केलेले महाराष्ट्रातील सुमारे 250 शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष अाणि क्रीडा संचालक सहभागी हाेणार अाहेत. परंतु विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाहीये. त्यामुळे तेंडुलकरांच्या मुलाखतीतून नेमकी प्रेरणा मिळणार तरी काेणाला असा प्रश्न अाता विचारला जाताेय.     याविषयी विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक विभागाचे संचालक डाॅ. दीपक माने यांना विचारले असता, या कार्यक्रमातून काही धाेरणात्मक निर्णय घेतले जाणार असल्याने हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी ठेवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येथे येणारे विविध शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष अाणि क्रीडा संचालक त्यांच्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये व्यायाम व खेळाबद्दल जागृती करणार अाहेत. या कार्यक्रमात केवळ या माेहिमेची पाॅलिसी ठरविण्यात येणार असल्याने केवळ निमंत्रितांसाठीच हा कार्यक्रम ठेवण्यात अाला अाहे. सचिनची मुलाखत विविध महाविद्यालयांमध्ये फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून दाखविण्यात येणार अाहे, असेही माने म्हणाले.     अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील एक तृतीयांश तरुण मुले-मुली काेणताही खेळ खेळत नाहीत किंवा व्यायामही करत नाहीत असे समाेर अाले अाहे. या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींना शारीरिक तंदुरुस्ती व खेळाकडे वळविण्यासाठी विद्यापीठाकडून या मिशन यंग अॅण्ड फीट इंडियाची सुरुवात केली जाणार अाहे. या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर तसेच, मानसशास्त्र तज्ज्ञ डाॅ. मीनल साेहनी यांची मनाेगते हाेणार अाहेत. त्याचबराेबर शैक्षणिक अभ्यासक्रमात क्रीडा प्रकारांचा अंतर्भाव कसा करता येईल यावर चर्चा देखील हाेणार अाहे. परंतु या माेहिमेच्या उद्घाटनाला विद्यार्थ्यांनाच प्रवेश नसल्याने ही माेहिम नेमकी अाहे तरी काेणासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. 

टॅग्स :PuneपुणेSachin Tendulkarसचिन तेंडूलकरPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थी