शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत पुणेरी पगडीला नाे एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 20:57 IST

पश्चिम महाराष्ट्र हल्लाबाेल सभेच्या सांगता सभेत छगन भुजबळ अाणि शरद पवार यांचा पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात अाले. यावर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये कुठली पगडी घालायची हे सांगून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टाेचले.

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा 20 वा स्थापनादिवस अाणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबाेल अांदाेलनाची सभा रविवारी संध्याकाळी पुण्यात पार पडली. यावेळी शरद पवार अाणि छगन भुजबळ यांचे स्वागत करताना राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण अाणि जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे  यांनी पुणेरी पगडी घालून दाेघांचे स्वागत केले. तेव्हा भाषणाला उभे राहताच राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यक्रमाला सत्कार करताना कुठली पगडी घालून स्वागत करायचे हे मी अाज सांगत अाहे अाणि या पुढे हिच पगडी वापरायची असे सांगत शरद पवार यांनी फुले पगडी भुजबळांना घालण्यास सांगितली.

     राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा 20 वा स्थापनादिवस अाणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबाेल अांदाेलनाच्या सभेला कार्यकर्त्यांनी माेठी गर्दी केली हाेती. भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर ते पहिल्यांदा जाहीर भाषण करणार असल्याने सगळ्यांचे लक्ष ते काय बाेलतात याकडे लागले हाेते. सुरुवातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची भाषणे झाली. भुजबळांच्या प्रकृतीमुळे ते व्हॅनिटीमध्येच बसून हाेते. अजित पवारांचे भाषण चालू असताना ते मंचावर अाले. यावेळी त्यांचा व शरद पवार यांचा पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात अाले. ही बाब खटकताच भाषणाच्या वेळी त्यांनी सर्वप्रथम कुठली पगडी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये घालायची हे सर्वांना सांगितले. अाणि हे कायम लक्षात ठेवण्याचे अावाहनही कार्यकर्त्यांना केले. त्यानंतर फुले पगडी अाणत भुजबळांचे पुन्हा स्वागत करण्यात अाले. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारChagan Bhujbalछगन भुजबळ