शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात स्वातंत्र्य दिनी पर्यटकांना 'नो एंट्री'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 20:42 IST

स्वातंत्र्य दिन व रविवार अशा दोन सुट्ट्या जुळून आल्याने पर्यटकांची शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपोलिसांची ठिकठिकाणी असणार नाकाबंदी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई  लोणावळा शहरात ३१ ऑगस्टपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी 

पुणे : लोणावळा शहर आणि परिसर पर्यंटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. परिसरातील भुशी धरण, धबधबे,किल्ले व निसर्ग सौंदर्याने नटलेले अनेक प्रेक्षणीय स्थळे हे पावसाळ्यात दरवर्षी पर्यटकांना भुरळ घालत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव असल्याने पहिल्यापासूनच लोणावळा शहर प्रशासनाने पर्यंटकांना शहर व परिसरात येण्यास बंदी घातली आहे. परंतु, तरीदेखील काही पर्यटक सरकारी नियमांचे उल्लंघन करून लोणावळा परिसरात भटकंतीसाठी येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी,पोलीस यंत्रणांनी १५ ऑगस्टच्या दिवशी लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येण्यास सक्त मनाई केली आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे. 

पोलिसांची ठिकठिकाणी असणार नाकाबंदी स्वातंत्र्य दिन व रविवार अशा दोन सुट्ट्या जुळून आल्याने पर्यटकांची शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील खंडाळा, खालापूर टोल नाक्यासह अनेक ठिकाणी पोलीस तपासणी कक्ष तयार करण्यात आले आहे. त्यामुळे चुकूनही मौजमजेसाठी शहरात येण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती लोणावळा शहर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले. 

लोणावळा शहरात ३१ ऑगस्टपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी शहरात ३१ ऑगस्टपर्यत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय लोणावळा नगरपरिषदेने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी रवि पवार यांनी दिली. शहरात कोरोना आजारामुळे झालेल्या मृत्युमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. याकरिता वरील निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 15 ऑगस्टपासून लोणावळा शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणारे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याची माहिती दिली.

टॅग्स :lonavalaलोणावळाPoliceपोलिसIndependence Dayस्वातंत्र्य दिनCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या