शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'इग्नू' कोणत्याही परिस्थितीत ज्योतिष विषय शिकविण्याचा निर्णय मागे घेणार नाही; ब्राह्मण महासंघासह राज्यातील ज्योतिष संस्थांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 18:07 IST

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (इग्नू) आता ज्योतिषशास्त्र विषय शिकवण्याला मान्यता दिली आहे.

पुणे : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (इग्नू) आता ज्योतिषशास्त्र विषय शिकवण्याला मान्यता दिली आहे. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वैज्ञानिक संस्था यांच्यासह पुरोगामी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. पण हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.तर काही संघटनांनी विद्यापीठाच्या ज्योतिषशास्र विषय शिकविण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना त्याचे समर्थन देखील केले आहे. या वादात आता ज्योतिष संस्थांसह ब्राह्मण महासंघाने उडी घेतली आहे. 

महाराष्ट्रातील ७० ज्योतिष संस्थासह ब्राह्मण महासंघाने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) या संस्थेला पत्र दिले आहे. यावेळी ब्राह्मण महासंघ व  ज्योतिष संस्थांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील ७० ज्योतिष संस्थासह महासंघाने इग्नू आता ज्योतिषशास्त्र शिकवण्याच्या संस्थेच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्याचे समर्थन देखील केले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत हा कोर्स मागे घेतला जाणार नाही असं आश्वासन संस्थेने आम्हाला दिले असल्याची माहिती दिली आहे. 

इग्नू यंदापासून ज्योतिषशास्त्रात पदव्युत्तर पदवी (एमए) आणि पदविका (डिप्लोमा) सुरू करणार आहे. नुकतेच या अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले. हिंदी आणि संस्कृत माध्यमातून हा अभ्यासक्रम असणार आहे. विद्यापीठाच्या ५७ प्रादेशिक केंद्रांवर हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो यावर हा अभ्यासक्रम बेतलेला असेल. ज्योतिषशास्त्र, ग्रह-ताऱ्यांचे परिणाम, कुंडली याबाबत अनेक मतभेद आहेत. मात्र आता त्याला स्वतंत्र विद्याशाखेचा दर्जा देण्याचा प्रयत्न इग्नूकडून सुरु आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने अशाच स्वरूपाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी काही वर्षांपूर्वी केला होता. मात्र देशातील अभ्यासक आणि वैज्ञानिकांनी एकत्रित येत तो प्रयत्न हाणून पाडला होता. मात्र, आता इग्नू पुन्हा एकदा अशाच स्वरूपाचा घाट घालत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठAstrologyफलज्योतिष