शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

क्रौर्य नाही, आध्यात्मिक शौर्य : संभाजीमहाराज मोरे; श्रीपाल सबनीस यांच्या टीकेस प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 13:16 IST

सौजन्यांचे हिशेबनीस होण्यापेक्षा संतसाहित्य वाचून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, अशा कडव्या शब्दांत संभाजीमहाराज मोरे (देहूकर) यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देसत्याला दंडवत घालत यादव यांनी संतसूर्य कादंबरी मागे घेतली : संभाजीमहाराज मोरेश्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, मोरे यांची टीका

पिंपरी : संतसाहित्याची विटंबना झाली, म्हणूनच लेखक आणि प्रकाशकांच्याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल करणारे आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. आनंद यादव यांना पायउतार करणारे आम्हीच वारकरी होतो. हे क्रौर्य नसून, संत साहित्याचे आध्यात्मिक शौर्य आहे. त्यामुळे सौजन्यांचे हिशेबनीस होण्यापेक्षा संतसाहित्य वाचून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, अशा कडव्या शब्दांत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे माजी प्रदेशाध्यक्ष, संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आणि संभाजीमहाराज मोरे (देहूकर) यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात मोरे  म्हणाले, ‘‘संतसूर्य कादंबरीमुळे तुकोबारायांसारख्या संत साहित्यिकांची विटंबना झाली होती. त्याबाबत वारकऱ्यांनी निषेध व्यक्त केल्यानंतर क्रौर्य आणि औदार्य यांचा विचार न करता सत्याला दंडवत घालत यादव यांनी संतसूर्य कादंबरी मागे घेतली. हा वैचारिक पराभव यादव यांना मान्य होता. ते स्वत: अध्यक्षपदावरून पायउतार झाले. हे वारकऱ्यांचे क्रौर्य नसून संतसाहित्याचे आध्यात्मिक शौर्य आहे. परंतु, क्रौर्याच्या अतर्क्य उनाड गप्पा मारणाऱ्या सबनीसांनी संतसाहित्य वाचून चिंतन करावे.उगाच वारकऱ्यांच्या आध्यात्मिक शौर्याला आव्हान देऊ नये.  ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे काठी देऊ माथा।।’ असे रोख-ठोक बोलणाऱ्या तुकोबारायांचे आध्यात्मिक शौर्य अभंगातून तपासून पाहावे. कारण तुकोबाराय म्हणतात, ‘‘मायबापाहून बहू मायावंत। करू घातपात शत्रुहूनि।।’’  

प्रसिद्ध साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी ‘संतसूर्य’ कांदबरीतून संत तुकाराममहाराजांचे चारित्र्यहनन केल्याचे संत तुकाराममहाराजांच्या वंशजांनी उघडकीस आणल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वादळ निर्माण झाले होते. त्यामुळे यादव यांना कादंबरी मागे घ्यावी लागली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी यादव यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात कार्यक्रम झाला. त्या वेळी ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक डॉ. आनंद यादव : जीवन आणि साहित्यगौरव विषयावरील परिसंवादात माजी साहित्य संमेलनाध्यक्ष सबनीस यांनी संतसाहित्यामध्ये क्रौर्य आहे का? असे विधान करीत वारकऱ्यांवर टीका केली. त्याला तुकोबारायांचे वंशज असणाऱ्या मोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसPuneपुणेsant tukaramसंत तुकाराम