शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

पूररेषा योग्य न आखल्यामुळे कोल्हापूरात महापूर : पर्यावरणवाद्यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 20:44 IST

पंचगंगा नदीची निळी आणि लाल पूर रेषा निम्म्यापेक्षा जास्त आत घेतल्याने सुमारे 500 हेक्टर जागा बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आली आहे..

ठळक मुद्देनिवासी बांधकामासाठी बदलली पूररेषा कोल्हापूर शहराच्या विकास आराखड्यात  पंचगंगा नदीच्या पूररेषेत बदल शहरातून वाहणाऱ्या सर्व नद्यांच्या पूररेषेच्या आत अतिक्रमण

पुणे : कोल्हापूर शहराच्या विकास आराखड्यात पंचगंगा नदीसाठीपूररेषा शास्त्रीय पद्धतीने चिन्हांकित करण्याऐवजी ती 1984,1989 आणि 2005 मध्ये आलेल्या पुराच्या पातळ्यांवर ठरविण्यात आली. त्यावर न्यायालयाने आक्षेप घेत जलसंपदा विभागाला शास्त्रीय पूर रेषा चिन्हांकित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर केलेल्या पूररेषा सर्वेक्षणात सुमारे ५०० हेक्टर (१२३५ एकर) जमीन पुराच्या पाण्यामुळे बाधित होणारे निवासी क्षेत्र दाखविण्यात आले. या निवासी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बांधकामे केली, तसेच अनेक ठिकाणी जमिनीची उंची वाढविली. परिणामी पूर पातळीत वाढ झाली, असा आरोप पर्यावरण तज्ज्ञ सारंग यादवाडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी माहिती अधिकर कार्यकर्ते विजय कुंभार, सजग नागरिक  मंचाचे जुगल राठी, एनएपीएमच्या सुनीती सु.र. उपस्थित होते.   यादवाडकर म्हणाले की, कोल्हापूर शहराच्या विकास आराखड्यात  पंचगंगा नदीच्या पूर रेषेत बदल केला आहे. नदीच्या ज्या पूर रेषा हव्या आहेत, त्यापेक्षा त्या कमी करून विकास आराखड्यावर अधोरेखित करण्यास सरकारने परवानगी दिली. पाटबंधारे खात्याने पूर रेषा निम्यापेक्षा खाली आणलेली आहे. परिमाणी पूररेषेच्या आत मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असल्याने नदीच्या प्रवाहात अडथळे निर्माण होऊन पूर पातळीत मोठी वाढ झाली.पंचगंगा नदीची निळी आणि लाल पूर रेषा निम्म्यापेक्षा जास्त आत घेतल्याने सुमारे 500 हेक्टर जागा बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळेच्या पूराचा सर्वाधिक फटका याच क्षेत्रात बसला आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याला पूर रेषा आत घेण्याची गरज का वाटली, असा प्रश्न ही यादवाडकर यांनी उपस्थित केला.

.............. पुण्यालाही बसू शकतो पूराचा फटका शहरातून वाहणाऱ्या सर्व नद्यांच्या पूररेषेच्या आत अतिक्रमण करण्यात आलेले आहेत. हे अतिक्रमणे कायदेशीर करण्यासाठी पूर रेषा बदलल्या जात आहेत. अशा परिस्थित पुण्याच्या वरील धरणातून जास्त पाणी सोडल्यास सांगली, कोल्हापूरपेक्षा मोठी हानी शहरामध्ये होऊ शकते, अशी भीती पर्यावरण वाद्यांनी यावेळी व्यक्त केली.................................................................................................... मॉल, हॉस्पीटल, बांधकाम व्यावसायिकांना बांधकामांच्या परवानग्या मिळाल्या कशा ?  बांधकामांसाठी पूर रेषा बदलली गेली. यावरून व्यावसायिकांच्या दबावापुढे सरकार किती हतबल आहे हे दिसुन येते. धरणांची देखरेख नियमित करण्याची गरज आहे, सध्याची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकार योग्य वेळी पावले उचलू शकत होते. मात्र, पूररेषेच्या आत बांधकाम करण्यास मुख्यमंत्री परवानगी कशी दिली जाते. मुख्यमंत्र्यांना योग्य माहिती संबधित विभागानी दिली नाही असे यातून स्पष्ट होते. - सुनीती सु. र. ...................................................................................................

 

टॅग्स :PuneपुणेriverनदीfloodपूरState Governmentराज्य सरकारEnchroachmentअतिक्रमण