चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही
By Admin | Updated: January 26, 2017 01:02 IST2017-01-26T01:02:31+5:302017-01-26T01:02:31+5:30
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना पोलीस आयुक्तालयाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून स्पष्ट

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना पोलीस आयुक्तालयाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये यंदा मोठे बदल करण्यात आले आहेत. यंदा पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहे. या उमेदवारी अर्जासोबत पोलीस आयुक्तालयाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडावे लागणार असल्याचे अफवा इच्छुकांमध्ये पसरली होती. त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी दोन दिवसांपासून इच्छुकांची मोठी गर्दी उसळली होती. अचानक मोठ्या संख्येने यासाठी अर्ज आल्याने इतक्या जणांना अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र कसे उपलब्ध करून द्यायचे, असा प्रश्न पोलीस प्रशासनापुढे निर्माण झाला होता. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यकता नसल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.