पुण्यात भाजपासमोर कुणाचेच आव्हान नाही : राकेशसिंग
By Admin | Updated: February 15, 2017 02:34 IST2017-02-15T02:34:36+5:302017-02-15T02:34:36+5:30
राज्यामध्ये निवडणुका होत असलेल्या दाही महापालिकांमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल, त्याचबरोबर पुण्यात भाजपासमोर कोणत्याच

पुण्यात भाजपासमोर कुणाचेच आव्हान नाही : राकेशसिंग
पुणे : राज्यामध्ये निवडणुका होत असलेल्या दाही महापालिकांमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल, त्याचबरोबर पुण्यात भाजपासमोर कोणत्याच पक्षाचे आव्हान नाही, असे प्रतिपादन पक्षाचे राज्याचे प्रभारी व खासदार राकेशसिंग यांनी केले.
भाजपा कार्यालयात राकेशसिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.
राकेशसिंग म्हणाले, ‘‘राज्यात पक्षाला अनुकूल वातावरण आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असून अनेक योजना जनहितासाठी राबवल्या आहेत. त्यामुळे पक्षाकडून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत राज्यातील शासनाने चांगले काम केले आहे. त्याची पावती महापालिका निवडणुकांमध्ये मतदारांकडून मिळेल.’’
(प्रतिनिधी)