शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बसचालकांवर नाही राहणार अंकुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 20:24 IST

‘पीएमपी’ने पाच ठेकेदारांकडून ६५३ बस भाडेतत्वावर घेतलेल्या आहेत. यातील बहुतेक बस बीआरटी मार्गावर सोडल्या जातात. या मार्गावर बससेवा चांगल्या पध्दतीने सुरू राहण्यासाठी ‘आयटीएमएस’ ही यंत्रणा मागील वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देथांब्यासमोर ही बस न थांबविल्यास प्रत्येक थांब्यामागे १०० रुपये दंडबस थांब्यावर थांबविली नाही तरी दंडाचा होणार पुनर्विचार : यंत्रणेत बदल होण्याची शक्यता

पुणे : भाडेतत्वावरील बसेसला इंटिलिजंट ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) च्या माध्यमातून बस थांब्यावर न थांबल्याबद्दल ठोठावण्यात येणाऱ्या दंडाचा पुनर्विचार केला जाणार आहे. त्यासाठी ‘आयटीएमएस’ यंत्रणेचे आॅडीट करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. ‘पीएमपी’ने पाच ठेकेदारांकडून ६५३ बस भाडेतत्वाव्बार घेतलेल्या आहेत. यातील बहुतेक बस बीआरटी मार्गावर सोडल्या जातात. या मार्गावर बससेवा चांगल्या पध्दतीने सुरू राहण्यासाठी ‘आयटीएमएस’ ही यंत्रणा मागील वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. मार्गावर सोडण्यात येणाऱ्या सर्व बसेसमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे या बसेसवर नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे. बसचे ठिकाण, वेग, थांब्यावर बस न थांबविणे (स्टॉप स्किपींग) यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले जात आहे. ‘पीएमपी’चे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही यंत्रणा अधिक सक्षम करत नियमांचे उल्लंघन करणारे चालक, ठेकेदारांना दंड ठोठावण्यास सुरूवात केली. त्यामध्ये त्यांनी बीआरटी मार्गावरील बसेसने प्रत्येक थांब्यावर काही वेळ थांबणे बंधनकारक केले. त्यानुसार ‘बीआरटी’ मार्गात प्रत्येक थांब्यावर किमान आठ सेकंद आणि बिगर बीआरटी मार्गावर चार सेकंद वेळ निश्चित करण्यात आली आहे. या वेळेनुसार थांब्यासमोर ही बस न थांबविल्यास प्रत्येक थांब्यामागे १०० रुपये दंड आकारला जातो. मुंढे यांनी स्टॉप स्किपींगचा मुद्दा ऐरणीवर आणत ठेकेदारांना लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यास सुरूवात केली. मार्च २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत स्टॉप स्किपींगचा दंड तब्बल ९३ कोटी रुपये तर आकारण्यात आला आहे. त्यामुळे पीएमपीकडून मिळणाऱ्या भाड्यापेक्षा एकुण दंडाची रक्कम जास्त होत असल्याचा दावा ठेकेदारांनी केला आहे. ‘आयटीएमएस’ यंत्रणेत त्रुटी असल्याने त्यात सुधारणा करण्याची मागणीही ठेकेदारांनी मुंढे यांच्याकडे केली होती. पण त्यानंतरही दंड आकारणे सुरूच राहिल्याने एका ठेकेदाराने याविरोधात थेट न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर इतर ठेकेदारांसाठी प्रशासनाने दंडाचा पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. प्रशासनातील काही अधिकारीही स्टॉप स्किपींगच्या यंत्रणेवर नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या यंत्रणेचे आॅडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या यंत्रणेचे काम पाहणाऱ्या संस्थेचे बीलही थांबविण्यात आल्याचे समजते. 

बस थांब्यावर थांबविली नाही तरी दंडाचा होणार पुनर्विचार : यंत्रणेत बदल होण्याची शक्यता

स्टॉप स्किपींगवर पीएमपीची अपेक्षा...- थांब्यावर प्रवासी नसला तरी बस थांबवावी- प्रवाशांनी चढ-उतार केल्यानंतरही बस निश्चित वेळेपर्यंत थांबवावी-  थांब्यासमोरच बस उभी करणे अपेक्षित ठेकेदार म्हणतात...थांब्यावर प्रवासी नसताना किंवा प्रवासी बस मधून उतरून गेल्यानंतरही बस थांबवून ठेवल्यामुळे वेळ फुकट जातो. एक-दोन सेकंदचा फरक पडला तरी दंड आकारला जातो. तसेच अनेकदा बस थांब्यासमोर किंवा लगत इतर खासगी वाहने उभी असतात. काही ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे बस थांब्यासमोर उभी करता येत नाही. थांब्याच्या पुढे किंवा आधी बस उभी केल्यासही ते स्टॉप स्किपींगमध्ये दाखविले जाते. ----------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल