शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वारशाला साजेशा कामाचं उत्तर नव्या पिढीकडे नाही : सत्यजित तांबे यांची खंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 16:47 IST

सध्याची राजकीय परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे..

ठळक मुद्दे'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा' व 'लौकिक' पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सध्याची राजकीय परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे. प्रत्येक विचारांचा एक काळ असतो. आपल्या देशाने क्रांतीचा इतिहास रचलेला आहे. याच विचाराने देशातील तरुणांनी चालले पाहिजे. 'स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील नेत्यांच्या कार्याचा तुलनात्मक विचार करता त्यांनी राष्ट्र उभारण्याचे काम केले.  त्यांच्या कार्य, विचारांचा हाच वारसा घेऊन तरुणांनी काम केले पाहिजे. पण या वारशाला साजेसं काय काम करावे, याचं उत्तर आपल्या पिढीला दुर्दैवाने मिळाले नाही, अशी खंत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली. पं जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे मोतीराम पौळ संपादित 'राजकीय आत्मचरित्रे : स्वरूप आणि समीक्षा' व महावीर जोंधळे लिखित 'लौकिक' या पुस्तकांचे प्रकाशन सत्यजित तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी राजकीय विश्लेषक सदा डुंबरे, राजकीय अभ्याक प्रा. प्रकाश पवार, लेखक महावीर जोंधळे आणि संपादक मोतीराम पौळ उपस्थित होते.'महाराष्ट्राची नवी दिशा आणि आजची राजकीय भूमिका' या विषयावर बोलताना तांबे म्हणाले, 'नव्या पिढीला काम करण्याची दिशा व प्रेरणा मिळायला हवी आहे. पूर्वीच्या नेत्यांच्या विचारांची, काम करण्याची प्रेरणा या आत्मचरित्रांमधून मिळते. प्रा. प्रकाश पवार म्हणाले, 'देशात सध्या राजकीय गुंतागुंत निर्माण झाली आहे. हा गुंता समजून घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांना वेळ नाही. गेल्या शतकातील महाराष्ट्राची राजकीय व्यवस्था समजून घेण्यासाठी या पुस्तकांचा नक्कीच फायदा होईल. पूवीर्चे नेते प्रामाणिकपणे जनतेच्या हितासाठीच लढले. हा राजकीय नेतृत्वांचा इतिहास समजून घेतला तरच पुढची राजकीय पिढी सक्षम घडेल.' महावीर जोंधळे म्हणाले, 'लोकशाही समृध्द करण्यासाठी पूर्वीच्या नेत्यांनी केलेल्या ध्येयनिष्ठ कामाला, कष्टाला आपण विसरून चालणार नाही. खरंतर हा कोण्या एका पक्षाचा विचार नाही, समर्थन नाही. जे पाहिले, अनुभवले, ते तटस्थपणे मांडले आहे. श्रीरंजन आवटे यांनीही मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन ऋतुजा फूलकर यांनी केले.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसSatyajit Tambeसत्यजित तांबेPoliticsराजकारण