शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
7
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
8
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
9
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
10
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
11
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
13
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
14
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
15
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
16
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
17
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
18
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
19
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
20
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...

मुुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही पुण्यातली शिवसेना कोमेजलेलीच..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 21:28 IST

पक्षप्रमुखांचा पुण्यावर रोष कायमच?

ठळक मुद्देडॉ. नीलम गोऱ्हे यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती राहिली अपूर्णच पुणे शहरात व जिल्ह्यातही शिवसेनेचा नाही आता कोणीही आमदार

पुणे : राज्यात सत्ताप्राप्ती झाल्यानंतरही पुण्यातील शिवसेनेला त्यातून काहीच संजीवनी मिळालेली नाही. मुख्यमंत्री झालेल्या पक्षप्रमुखांचा पुण्यावरचा रोष कायम आहे. त्यामुळेच त्यांनी सत्तावाटपात पुण्याला वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या दिसत आहेत. कसलेही पद नाही, कोणी विचारतही नाही व कोणी काही सांगतही नाही अशी पुण्यातील शिवसेनेची अवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून संघटनेत निष्ठेने काम करणाºया शिवसैनिकांमध्ये यामुळे अस्वस्थता आहे.सन २०१४ ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच पक्षप्रमुखांसह मुंबईतील शिवसेनेच्या सर्व बड्या नेत्यांनी पुण्यातील शिवसेनेकडे दुर्लक्ष केले आहे. ती निवडणूक शिवसेना स्वतंत्रपणे लढली. त्यात पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांवर भाजपाला विजय मिळाला. शिवसेनेचा पराभव झाला. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणूकीतही शिवसेनेला काहीच कामगिरी करता आली नाही. फक्त ९ जागा निवडून आल्या, त्या तुलनेत भाजपाने मात्र ९८ जागा मिळवत स्वबळावर पालिकेची सत्ता मिळवली. तेव्हापासूनच पुण्यातील शिवसेना मुंबईतून दुर्लक्षित झाली आहे.त्याचाच परिणाम म्हणून सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत युती असूनही पुणे शहरातील किमान एक तरी जागा शिवसेनेला मिळावी म्हणून पुण्यातून प्रयत्न होत असतानाही मुंबईने तिकडे लक्ष दिले नाही. पुण्यात जागा मागता तर पुण्याने शिवसेनेला काय दिले आहे ते सांगा असा सवालच खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांना केला होता. विधानसभेला जागा मिळाली नाहीच, पण लोकसभेला काही नेत्यांनी भाजपाबरोबर अनावश्यक जवळीक केल्याचा ठपका ठेवून पुण्यातील शहर प्रमुखांची दोन्ही पदे रद्द करण्यात आली. विधानसभा मतदारसंघ निहाय प्रमुख नियुक्त करण्यात आले. त्यानंतर पुन्हा शहर प्रमुख म्हणून संजय मोरे यांची नियुक्ती झाली, त्यानंतर विधानसभा मतदारसंघ प्रमुख निष्प्रभ झाले. शाखाप्रमुख हे संघटनेतील महत्वाचे पदही दुर्लक्षित झाले आहे. हा धरसोडपणा संघटनेला मारक ठरत असल्याचे ज्येष्ठ शिवसैनिकांचे मत आहे. पदाधिकारी नाहीत, आहेत त्या नगरसेवकांना ताकद दिली जात नाही, संघटनेचा म्हणून कार्यक्रमच दिला जात नसल्याने करायचे काय या प्रश्नाने कार्यकर्ते हैराण झाले आहेत. शिवसैनिकांबरोबर संवाद राहिलेला नाही, बैठका, चर्चा असे काहीच होत नाही. शहर प्रमुख पदावरून दूर केल्यामुळे महादेव बाबर व चंद्रकांत मोकाटे हे दोन्ही माजी आमदारही सक्रिय राहिलेले नाहीत. शहर प्रमुख म्हणून नव्याने नियुक्त केलेले संजय मोरे हेही पक्षाला राजकीयदृष्ट्या चर्चेत ठेवण्यात कमी पडत आहेत.राज्यात सत्ता आल्यानंतर यात काही फरक पडेल, पुण्याकडे लक्ष दिले जाईल अशी शिवसैनिकांची अपेक्षा होती, मात्र तसे काहीही झालेले नाही. डॉ. नीलम गोऱ्हे यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती पुर्ण झालेली नाही. पुणे शहरात व जिल्ह्यातही शिवसेनेचा आता कोणीही आमदार नाही. त्यामुळे राजकीय ताकदीत शिवसेना आधीच दुर्बल झाली आहे. पक्षप्रमुखांबरोबर संपर्क साधणेही पुण्यातील पदाधिकाºयांना अवघड झाले आहे.  

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNeelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरे