मिळकतकरातून महापालिकेला मिळाले एक हजार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:15 IST2021-08-28T04:15:19+5:302021-08-28T04:15:19+5:30
पुणे : कोरोना आपत्तीमुळे आर्थिक आपत्तीत सापडलेल्या महापालिकेला, मिळकतकरातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मोठा आर्थिक दिलासा दिला आहे़ १ एप्रिल ...

मिळकतकरातून महापालिकेला मिळाले एक हजार कोटी
पुणे : कोरोना आपत्तीमुळे आर्थिक आपत्तीत सापडलेल्या महापालिकेला, मिळकतकरातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मोठा आर्थिक दिलासा दिला आहे़ १ एप्रिल ते २७ आॅगस्ट, २०२१ पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत मिळकत करातून १ हजार १ कोटी ८८ लाख रूपये जमा झाले आहेत.
मिळकतकर विभागप्रमुख विलास कानडे यांनी याबाबत माहिती दिली़ गतवर्षी म्हणजेच १ एप्रिल ते २७ एप्रिल, २०२० या काळात महापालिकेला मिळकतकरातून ७९० कोटी ३७ लाख रूपये उत्पन्न मिळाले होते़ यामध्ये या वर्षी २११ कोटी ५१ लाख रूपये अधिक मिळकतकर जमा झाला आहे.
आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत जो मिळकतधारक चालू वर्षाचा पूर्ण मिळकतकर भरेल, त्यास दरवर्षी महापालिकेकडून निवासी मिळकतकरात १५ टक्के सवलत दिली जाते़ या सवलतीचा यंदा ४ लाख ४ हजार २७५ मिळकतधारकांनी लाभ घेतला व आपला ३० जूनपर्यंत ३०३ कोटी ७६ लाख रूपये कर जमा केला़ यामध्ये या सर्वांना मिळून ५० कोटी ४९ लाख रूपये इतकी सवलत मिळाली आहे.
निवासी मिळकतधारकांबरोबर अन्य १ लाख ४२ हजार २३८ मिळकतधारकांना ५ व १० टक्के सवलत देण्यात आली़ यातून ४९७ कोटी २५ लाख रूपये जमा झाले असून, या सर्वांना ११ कोटी ८० लाख रूपये इतकी सवलत मिळाली आहे.