महापालिकेला अखेर आले शहाणपण

By Admin | Updated: February 24, 2015 01:25 IST2015-02-24T01:25:35+5:302015-02-24T01:25:35+5:30

शहरात स्वाइन फ्लूची तीव्रता वाढून दोन महिने झाले. त्यामध्ये सात रु ग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिकेला ‘टॅमिफ्लू’ गोळ्या खरेदी

NMC came to power finally | महापालिकेला अखेर आले शहाणपण

महापालिकेला अखेर आले शहाणपण

पिंपरी : शहरात स्वाइन फ्लूची तीव्रता वाढून दोन महिने झाले. त्यामध्ये सात रु ग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिकेला ‘टॅमिफ्लू’ गोळ्या खरेदी करण्याचे शहाणपण सुचले आहे. तरी काही औषधे पालिकेकडे उपलब्ध नाहीत. यासाठी ते राज्यशासन आणि औषध कंपन्यांकडे बोट दाखवून शांत बसत आहेत. औषधे कंपन्यांकडेच नाहीत, असे सांगून पालिका आपल्या चुकांवर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, महापालिकेने ‘टॅमिफ्लू’ पाच हजार गोळ््या सोमवारी खरेदी केल्या. सिरपच्या ५०० बाटल्यांची खरेदी करण्यासाठी प्रस्ताव दिला. त्यात कंपनीकडून २० बाटल्या मिळालेल्या आहेत, असे पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी डॉ. सुहास माटे, डॉ. किशोर गुजर उपस्थित होते.
२००९-१० मध्ये शहरात ‘स्वाइन फ्लू’ने हाहाकार माजवला होता. त्यामध्ये अनेकांना जीवही गमवावा लागला होता. एक जानेवारीपासून ‘स्वाइन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील अनुभव पाठीशी असतानाही प्रशासनाने औषधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. पालिका प्रशासन राज्य सरकारवर अवलंबून राहिले. मात्र, राज्य शासनाकडे संपूर्ण राज्यातूनच मागणी होत असते. आजाराची गंभीर दखल घेत पालिकेनेही औषधे खरेदी केली नाहीत. दरम्यानच्या काळात या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली. त्यानंतर ‘टॅमिफ्लू’ गोळ्या खरेदी करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रस्ताव पाठविला.
एक जानेवारीपासून राज्य शासनाकडून महापालिकेने ७५ मिलीच्या ५० हजार ‘टॅमिफ्लू’ गोळ्या मागितल्या होत्या. त्यामध्ये १७ हजार गोळ्या मिळाल्या आहेत. ४५ मिलीच्या ४० हजार गोळ्या मागितल्या होत्या. त्या ४ हजार ५०० गोळ््या मिळाल्या आहेत. ३० मिलीच्या ३० हजार गोळ््यांची मागणी केली होती. १ हजार गोळ््या मिळाल्या आहेत. सिरपच्या फक्त २० बाटल्या मिळालेल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: NMC came to power finally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.