महापालिकेचा अर्थसंकल्प आठ हजार कोटींच्यावर जाणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST2021-03-01T04:12:10+5:302021-03-01T04:12:10+5:30
पुणे : राज्यात कोरोना आपत्तीत सर्वाधिक मिळकतकर जमा करणारी महापालिका ठरलेल्या पुणे महापालिकेचा या वर्षीचा (सन २०२१-२२) अर्थसंकल्प आठ ...

महापालिकेचा अर्थसंकल्प आठ हजार कोटींच्यावर जाणार?
पुणे : राज्यात कोरोना आपत्तीत सर्वाधिक मिळकतकर जमा करणारी महापालिका ठरलेल्या पुणे महापालिकेचा या वर्षीचा (सन २०२१-२२) अर्थसंकल्प आठ हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सोमवारी अर्थसंकल्प सादर होणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकताच ७ हजार ६५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय आराखडा स्थायी समितीला सादर केला होता. या वर्षीच्या स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत समितीने वर्गीकरणातून २४६ कोटी रुपये सर्वपक्षीय नगरसेवकांना आपआपली विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी दिले आहेत. हा निधी मात्र पुढील वर्षाच्या म्हणजे २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध होणार आहे. त्यातच या पंचवार्षिक मुदतीतील यंदाचे शेवटचे वर्ष असल्याने, या वर्षीचा अर्थसंकल्प हा कोटींच्या कोटी उड्डाणे घेऊन आठ हजारांचा टप्पा पार करणार हे बोलले जात आहे.
-------
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आज (सोमवार दि. १ मार्च) रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
* गेल्या वर्षीचे आयुक्तांचा अर्थसंकल्पीय आराखडा :
७,३९० कोटी रुपये
* सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेला २०२०-२१ चा अर्थसंकल्प : ७,६५० कोटी रुपये
--------